Download App

Sanjay Raut : 2024 च्या आधी भाजप फुटणार! NDA फक्त नौटंकी; राऊतांचा दावा

Sanjay Raut : देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी (Lok Sabha Election) सुरू झाली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली आहे. या आघाडीत ठाकरे गटाचाही सहभाग आहे. ठाकरे गटाकडून सध्या भाजपविरोधाची धार तीव्र करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप, एनडीए आघाडी आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपबाबत (BJP) मोठा दावा करत खळबळ उडवून दिली.

राऊत म्हणाले, 2024 आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी ही एक नौटंकी आहे. इंडिया आघाडी तयार झाल्यानंतर भाजपला एनडीएची आठवण झाली. तोपर्यंत एनडीए दिसतही नव्हते. तसेही एनडीएकडे इकडून तिकडून घेतलेलेच लोकं आहेत. शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीए शून्य आहे. बाकीचे लोक येतात जातात. सध्या एनडीए अस्तित्वात नाही. त्यामुळे एनडीए राहिल की नाही माहिती नाही. पण, 2024 मध्ये भाजपही फुटलेला पक्ष असेल याची मला खात्री आहे, असा दावा राऊत यांनी केला.

Manmohan Singh : पटेल यांचा एका नकार अन् देशाच्या राजकारणात झाली डॉ. मनमोहन सिंग यांची एन्ट्री…

त्यांना किंमत चुकवावीच लागेल

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्ष पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी अनेक पक्षांतरे केली आहेत. त्यामुळे पक्षाबद्दल जी नीतिमत्ता असते ती त्यांची तपासावी लागेल. अनेक पक्षांतून येऊन अध्यक्ष झाल्यानंतर ज्यांन घटनाबाह्य सरकार बसवलं यांच्याबद्दल त्यांना किती वेदना आहेत. दुःख आहे हा तपासाचा विषय आहे. आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आह. दुसऱ्या कोणाकडून दबाव निर्माण केला जात नाही, असे म्हणत त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले. जनतेच्या मनात रोष आहे या सगळ्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

आता मोदी मॅजिक संपली

आधी मोदी है तो मुमकीन है अशा घोषणा दिल्या जात होत्या. आता मात्र आमच्या इंडिया आघाडीनंतर त्यांनाही एनडीए आघाडीची आठवण झाली आहे. थोडक्यात अकेला मोदी काफी है, असे चित्र सध्या नाही. इंडिया आघाडी निर्माण झाल्यानंतर मोदी अकेला नहीं चलेगा, ही जाग भाजपला आली. त्यामुळे त्यांन इथून तिथून लोक जमा केले. आताची एनडीए कमकुवत आहे. एआयएडीएमकेही या आघाडीतून नुकताच बाहेर पडला आहे. यानंतर अजूनही काही लोक भाजपमधून बाहेर पडतील नव्हे भाजपाच फुटेल.

Tags

follow us