Download App

16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीची तारीख ठरली; नार्वेकर काय निर्णय घेणार? आमदारांची धाकधूक वाढली…

  • Written By: Last Updated:

मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) फुटीनंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने हे या प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी अद्याप याबाबात निर्णय घेतला नव्हता. दम्यान, आता आमदार अपात्रतेबाबतच्या (MLA disqualified) प्रत्यक्ष सुनावणीची वेळ अखेर निश्चित झाली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी होणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर सोळा आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी 14 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सर्व आमदारांची वैयक्तिक सुनावणी होणार आहे. दुपारी 12 वाजता सुनावणी सुरू होईल.

राज्य विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी होणार असून त्याच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिवसेनेच्या शिंदे गटातील 40 आणि ठाकरे गटातील 14 आमदार हजर राहणार आहेत. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर 34 याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करण्याची व त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी होणार असून त्यावेळी संबंधित आमदारांना बोलावण्यात येणार आहे.

आठवलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण खासदार, आमदार यांच्या आरक्षणाला विरोध 

आतापर्यंत काय झालं?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत युती केली, त्यानंतर शिंदे गटाने पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षावर दावा केला होता. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर आयोगाने शिंदे गटाच्या शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह दिले होते. मात्र, शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाने शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका सुप्रीम कोर्टात केली दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्षांना हे सर्व अधिकार दिले, असं सांगत विधानसभा अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा, असं सांगितलं. त्यासाठी हा निर्णय लवकरात लवकर व्हावा असे निर्देशही दिले. मात्र, अद्यापही यावर निर्णय झाला नव्हता.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणूनबूजून या अपात्र आमदारांच्या केस प्रकरणी सुनावणी करत नाहीत, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. दरम्यान, आता विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीची तारीख निश्चित झाल्याने ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांची धाकधूक वाढली आहे. या सुनावणीत काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us