Sushma Andhare on Serious Crime Bill to be introduced in Lok Sabha : आज संसदेत महत्त्वाची विधेयक मांडली जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे विधेयक मांडणार आहेत. गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास (Lok Sabha) पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू आणि काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकांद्वारे केली जाणार आहे.
विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार, जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या (पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे) प्रकरणात सलग ३० दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्याला पदावरून काढून टाकू शकतील. या विधेयकावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. यातच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही (Sushma Andhare) ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
30 दिवसापेक्षा अधिक तुरुंगवास झालेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पदावर राहता येणार नाही यासंबंधी grok ला प्रश्न विचारला असता याचा फटका अमित शाह ना बसू शकतो. असे grok सांगत आहे. पक्षांतर्गत विरोधकांना चूक करण्यासाठी तर हे विधेयक नाही ना? https://t.co/Rb6JU5zyvQ
— SushmaTai Andhare (@andharesushama) August 20, 2025
30 दिवसांपेक्षा अधिक तुरुंगवास झालेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पदावर राहता येणार नाही यासंबंधी grok ला प्रश्न विचारला असता याचा फटका अमित शाहांना बसू शकतो. असे grok सांगत आहे. पक्षांतर्गत विरोधकांना चूक करण्यासाठी तर हे विधेयक नाही ना? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. सोबत ग्रोकच्या संभाषणाचाही संदर्भ त्यांनी दिला आहे.
विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार, जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या (पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे) प्रकरणात सलग ३० दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्याला पदावरून काढून टाकू शकतील. लोकसभेतील सरकारी कामकाजाच्या आजच्या वेळापत्रकात संविधान (१३० वी दुरूस्ती) विधेयक, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक सादर केले जाणार आहे. ही तीन विधेयके सादर केल्यानंतर ती विचारार्थ संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्याचाही उल्लेख कामकाजाच्या वेळापत्रकात करण्यात आल्याची माहिती आहे.