BRS VBA allience : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी बीआरएसची (BRS) व्याप्ती देशभरात वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून सुरूवात केली. आतापर्यंत अनेक माजी आमदार, खासदारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) हस्ते करून केसीआर यांनी मास्टर स्ट्रोक मारला होता. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत तेलंगणात झालेल्या या कार्यक्रमाची महाराष्ट्रात चर्चा रंगली होती. शिवाय, अद्याप वंचित मविआत समावेश नसल्यानं वंचित बीआएरएससोबत जाण्याची शक्यता बोलली जाते. दरम्यान, वंचितचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे (Siddharth Mokale) यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. (Siddharth Mokale on K Chandrasekhar Rao over brs and vanchit bahujan alinece)
उद्धव ठाकरे यांनी वंचितसोबत युती केली आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत वंचितांचा समावेश करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष अनुकूल नाहीत. त्यावरून काही दिवसांपूर्वी खुद्द प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंनी तुमचं काय ते ठरवा, अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ, असा इशारा दिला होता. त्यामुळं वंचित बीआएससोबत जाऊ शकते, अशी शक्यता बोलली जाते. यावर बोलतांना मोकळे यांनी सांगितलं की, वंचित बहुजन आघाडी आणि BRS या दोन पक्षात युती संदर्भात बोलणी सुरू असल्याची बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आली आहे. या बातमी मध्ये काहीही तथ्य नाही. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी तेलंगणा आणि महाराष्ट्रात संभाव्य युतीसाठी सध्या तरी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नाही. तसेच BRS कडून तेलंगणा किंवा महाराष्ट्रात अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
IND vs WI : नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी घेतला निर्णय, रोहित, विराट संघाबाहेर
ते म्हणाले, तेलंगणा सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकर कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र त्यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.
केसीआर यांच्या नेतृत्वाखालील BRS सरकारने राज्यातील प्रत्येक क्षेत्रात एस, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. संभाव्य राजकीय युतीसाठी बीआरएसने पुढाकार घेतल्यास, वंचित बहुजन आघाडी त्याबद्दल निश्चितपणे विचार करेल. बीआएसचा मताचा वाटा, लोकप्रियता आणि वंचितच्या सामाजिक अजेंडाला चालना देण्यासाठी बीआरएस काय करू शकते यासारखे अनेक घटक युती संदर्भात निर्णायक ठरतील. तेलंगणातील निवडणुकीत त्यांना मदत करण्यासाठी आमच्याकडे मतदारांचे संख्याबळ आहे. पण बीआरएस हा वंचितसाठी साठी महाराष्ट्रात किती उपयुक्त सहयोगी असू शकतो, हा ही आमच्यासमोर प्रश्न आहे. मात्र बीआरएसकडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास नक्कीच वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल, असं मोकळे यांनी सांगितलं.