…म्हणून चंद्रकांत पाटील म्हणाले, मी अजितदादांपेक्षा सिनिअर

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी मंत्रिमंडळातील अनेक आमदार अनुपस्थित होते. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. आता अजित पवार यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजित पवारांपेक्षा जास्त काळ मी समाजकारणात घालवला आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे अजित पवारांनी माझ्याबद्दल जी टिका केली त्याबद्दल खेद […]

Untitled Design   2023 03 19T152814.764

Untitled Design 2023 03 19T152814.764

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी मंत्रिमंडळातील अनेक आमदार अनुपस्थित होते. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. आता अजित पवार यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजित पवारांपेक्षा जास्त काळ मी समाजकारणात घालवला आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे अजित पवारांनी माझ्याबद्दल जी टिका केली त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे पाटील म्हणाले आहे.

नेमकं काय म्हणाले आहे चंद्रकांत पाटील
मी वरच्या सभागृहात असताना अपुऱ्या माहितीच्या आधारे अजित पवारांनी माझ्याबद्दल जी टिका केली त्याबद्दल खेद व्यक्त करतो. अजित पवारांपेक्षा जास्त काळ मी समाजकारणात घालवला आहे. १९८० पासून सलग मी समाजकारणात पूर्णवेळ काम करतो. पूर्णवेळ काम करताना घर दार सोडून राहावे लागते. मी आजवर केलेल्या कामांना आपल्या विधानांनी Damaged करण्याचा अजित पवारांनी प्रयत्न करून नये.

मंत्री गडकरी म्हणाले…राजकारणात लोकांना मूर्ख बनवतो तो यशस्वी होतो

काय आहे प्रकरण? जाणून घ्या
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाचे काही आमदार तसेच मंत्री अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. हे पाहताच विरोधी पक्षनेते अजित पवार हे संतापले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात बदल, दोघांना डच्चू

यावेळी बोलताना पवार म्हणाले, आमचे सरकार असताना मी मंत्री होतो मात्र त्याकाळातही मी सकाळी ९ वाजता सभागृहात उपस्थित राहायचो. मात्र सकाळी ९:३० वाजता कामकाज सुरू झाले मात्र सभागृहात एक ही मंत्री उपस्थित नाही. किमान संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तरी उपस्थित राहायला हवं होतना. यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. मंत्री कशाला केलं जातंय ? महाराष्ट्र बघतोय एक मंत्री उपस्थित नाही, अशा शब्दात अजित पवारांनी आपला राग व्यक्त केला होता.

Exit mobile version