Download App

“…तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील” काँग्रेसकडून भाजपला इशारा

  • Written By: Last Updated:

“एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते……याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील.” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. (Rahul Gandhi Convicted)न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. त्यावर  काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही त्यावर टीका केली आहे. टीका करताना ते म्हणाले की एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते. याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील.

NIA Action : नागपूरमध्ये दोघे पाकिस्तानच्या संपर्कात, एनआयएच्या धाडीत धक्कादायक माहिती

याच मुद्द्यांवरून प्रियांका गांधी यांनीही एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, “घाबरलेली सत्ता सगळ्या यंत्रणा वापरून साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. सत्य बोलत जगलो आहे, सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू. सत्याची शक्ती आणि करोडो देशवासीयांचे प्रेम त्यांच्या पाठीशी आहे.”

मोदी आडनावावर टीका करणं भोवलं; गुजरात कोर्टाकडून राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा

Tags

follow us