Download App

…म्हणून भारत जोडो यात्रा थांबवा; सरकारचे राहुल गांधी यांना पत्र

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : जगावर पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचे संकट येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा फक्त चीन मध्येच नाहीत जगातील इतर अनेक देशात जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं देखील सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित ‘भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मनसुख मांडवीय यांनी लिहलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. तसेच भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.

याच पत्रात त्यांनी यात्रेदरम्यान कोरोनाच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. तर ते पुढे म्हणाले आहेत की कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. त्यामुळे एकप्रकारे केंद्र सरकारकडून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबवण्याची विंनती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Tags

follow us