बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सोलापुरातील अनगर नगरपंचायत निवडणुकीला स्थगित देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Untitle

Untitle

Anagar Nagarpanchyat Election : बहुचर्चित सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या (Anagar Nagarpanchyat Election ) निवडणुकीत एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आलीयं. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता पुढील सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कारवाई होणार आहे. या निवडणुकीला स्थगिती मिळाल्याने एकच चर्चा रंगलीयं.

या निवडणुकीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनगरमध्ये माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांनी उमेदवार अर्ज दाखल केला होता. मागील काही वर्षांपासून या नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत असल्याचा इतिहास सांगितला जात होता. मात्र, उज्वला थिटे यांना अजित पवार गटाची उमेदवारी मिळाल्यानंतर थिटे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज भरताना नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. या नाट्यमय घडामोडींमुळे ही निवडणूक चर्चेत आली होती.

कोकणात प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला मिळालाय निलेश राणेंसारखा हिरा; मालवणमध्ये एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी ‘

राजन पाटील यांनी आपल्या मागे गुंड पाठवल्याने मला निवडणुकीचा अर्ज भरता येत नव्हता, असा आरोप उज्वला थिटे यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांच्या बंदोबस्तात पहाटेच्या सुमारास उज्वला थिटे यांनी आपला निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता. पोलिस बंदोबस्तात थिटे यांनी अर्ज दाखल केल्याने अनगर नगरपंचायतीची निवडणूक चर्चेचा विषय बनली.

त्यानंतर अर्जावर सूचकाची सही नसल्याने उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता पाटील, उज्वला थिटे, सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला. उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर सरस्वती शिंदे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध झाल्या.

कोकणात प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला मिळालाय निलेश राणेंसारखा हिरा; मालवणमध्ये एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी ‘

दरम्यान, सर्व प्रक्रिया बिनविरोध पार पडली पडली असली तरी प्राजक्ता पाटील यांना अधिकृतपणे नगराध्यक्ष जाहीर होण्यासाठी त्यांना १० डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांना ४ ते १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत यांच्या निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले असून आता सुधारित कार्यक्रमानुसार येथील निवडणूक प्रक्रिया घेतली जाईल, असे आदेश दिले आहेत.

Exit mobile version