State executive of BJP announced : भाजपाची (BJP) नवीन प्रदेश कार्यकारिणी आज दुपारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माधव भंडारी यांच्यासह 17 उपाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे सहा तर विदर्भ आणि मराठवाडाच्या वाट्याला प्रत्येकी तीन उपाध्यक्षपद आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे.
नवीन प्रदेश उपाध्यक्ष
महादेव भंडारी (कोकण), चैनसुख संचेती (पश्चिम विदर्भ), सुरेश हळवणकर (पश्चिम महाराष्ट्र), संजय भेगडे (पश्चिम महाराष्ट्र), अमर साबळे (पश्चिम महाराष्ट्र), स्मिता वाघ (उत्तर महाराष्ट्र), जयप्रकाश ठाकूर (मुंबई), संजय भेंडे (पूर्व विदर्भ), गजानन घुगे (मराठवाडा), राजेश पांडे (पश्चिम महाराष्ट्र), विक्रम बावस्कर (पश्चिम महाराष्ट्र), अतुल काळसेकर (कोकण) अजित गोपछडे (मराठवाडा), एजाज देशमुख (मराठवाडा), धर्मपाल मेश्राम (पूर्व विदर्भ) राजेंद्र गावित (उत्तर महाराष्ट्र)
नवीन प्रदेश सरचिटणीस
माधवी नाईक (ठाणे), विक्रांत पाटील (कोकण), मुरलीधर मोहोळ (पश्चिम महाराष्ट्र), रणधीर सावरकर (विदर्भ), संजय केनेकर (मराठवाडा), विजय चौधरी (उत्तर महाराष्ट्र)
नवीन प्रदेश चिटणीस
भरत पाटील (पश्चिम महाराष्ट्र), संजय डेहणकर (पश्चिम विदर्भ), वर्षा तडहाळे (पश्चिम महाराष्ट्र), सुरेखा थेतले (कोकण), अरुण मुंडे (उत्तर महाराष्ट्र), महेश जाधव (पश्चिम महाराष्ट्र), राणी द्विवेदी (मुंबई), विद्या देवाळकर (पूर्व विदर्भ), अजय भोळे (उत्तर महाराष्ट्र), देविदास राठोड (मराठवाडा), शालिनीताई बूंधे (मराठवाडा), सरिता गाकरे (पश्चिम विदर्भ), योगिता पाटील (कोकण), सुरेश बनकर (मराठवाडा), किरण पाटील (मराठवाडा), नवनाथ पडळकर (पश्चिम महाराष्ट्र)