Prakash Ambedkar on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचितचे संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात गेल्या काही दशकांपासून राजकीय संघर्ष आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत युतीची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी आपलं शरद पवार यांच्याशी जुनं भांडण असल्याचं म्हटलं होतं. पवार आणि आंबेडकर यांच्यातील हा वाद नेमका काय आहे? यावर प्रकाश आंबेडकर यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात भाष्य केलं.
ते म्हणाले की त्यांचं काय आहे हे मला माहिती नाही. मी त्यावर बोलणार नाही. शेकाप पक्षाच्या रायगडमधील नेतृत्वासोबत बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे संबंध होते. त्यामध्ये दि. बा. पाटील किंवा दत्ता पाटील यांच्या समावेश होता. दि. बा. पाटलांचा कमी संबंध होता पण दत्ता पाटलांशी चांगला संबंध होता. दत्ता पाटलांचं कुटुंब खोती नष्ट करण्याच्या चळवळीपासून सोबत होते. तिथूनच ते पहिल्यांदा आमदार झाले होते.
लाथ मारुन संजय राऊतांना बाहेर काढलं पाहिजे; शिरसाटांची खालच्या स्तरावर जाऊन टीका…
नंतरच्या काळात शरद पवारांनी जेव्हा त्यांना नाकारले तेव्हा ते माझ्याकडे आले आणि आपण सर्वजण मिळून एकत्र निवडणूक लढवू. मी देखील त्यांना ठीक आहे असे म्हटले. त्यावेळी काँग्रेस त्यांना दोन-तीन जागा देणार होती पण शरद पवार बाहेर पडल्यामुळे शेकाप, डावे, जनता दल यांना वीस ते पंचवीस जागा दिल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले की आपण निवडून आले की पुन्हा राजकारण करु पण त्यामध्ये आम्ही वगळले गेलो होतो. त्यामध्ये त्यांचे काय अढी आहे हे त्यांनाच माहिती. आम्ही देखील त्या शोधामध्ये गेलो नाही. आम्ही आमचे आंदोलन सुरुच ठेवले. सत्ता हे त्यावेळी आमचे केंद्र नव्हते. आमच्याबद्दल त्यांच्या मनात काय अढी आहे हे शरद पवारांनाच माहिती, आम्हाला माहिती नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
Ahmednagar News : राष्ट्रवादी भवनात धुडगूस…माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल…
व्ही. पी. सिंग यांच्या काळात तुम्हाला राज्यसभेवर जाण्यासाठी शरद पवार यांनी मदत केल्याचे म्हटले जाते. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की त्यावेळी शरद पवार यांनी पाठिंबा दिला नाही. त्यावेळी शरद पवार काँग्रेस मध्ये होते आणि राज्यातील जनता दालाचे नेतृत्वा मी, शेतकरी संघटनेचे शरद जोशी आणि दत्ता सामंत आम्ही तिघेचं करत होतो. त्यामुळे शरद पवार यांचा काहीही संबंध नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.