मुख्यमंत्रिपद असो वा मंत्रिपद, काहीच पर्मनंट नसतं; नाराज सुधीर मुनगंटीवारांचा पुन्हा वरिष्ठ नेतृत्वाकडे रोख

Sudhir Mungantiwar : पर्मनंट कुणी नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कुणी मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नाही.

Sudhir Mungantiwar On Bjp senior leader

Sudhir Mungantiwar On Bjp senior leader

Sudhir Mungantiwar On Bjp senior leader: नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप (BJP) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये भाजपला यश मिळाले. पण भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवारांना (Sudhir Mungantiwar ) चंद्रपूर (Chandrapur)जिल्ह्यात खास काही कामगिरी करता आलेले नाहीत. त्यामुळे मुनगंटीवारांना हा मोठा धक्का आहे. परंतु त्यामुळे ते भाजप पक्ष नेतृत्वावर नाराज झालेले आहे. पक्षाने बळ न दिल्याने ही अवस्था झाल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी पुन्हा पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. (Sudhir Mungantiwar On Bjp senior leader)

Union budget : यंदाच्या अर्थसंकल्पात तुम्हाला स्वतात काय हवंय?; सरकारला थेट सांगता येणार



मी नाराज पण योग्य सल्ला देण्याची जबाबदारी…

सुधीर मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी कधीच नाराज असत नाही. माझ्या आयुष्यात सर्वात मोठी शक्ती भगवान महादेव यांनी दिली आहे. ती शक्ती म्हणजे मी नाराजाच होत नाही. पण योग्यक्षणी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझी निश्चितपणे आहे. कार्यकर्त्यांचा आवाज होणे जबाबदारी आहे. कार्यकर्ते माझ्यापर्यंत भूमिका पोहोचवतात ते सांगतो.

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ टायटल सॉंग प्रदर्शित


मुख्यमंत्री ज्यांचे आहे, ते येणार आहे, जाणार नाही

मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत का ? यावर ते म्हणाले, माजी नाराजी नाही. पण नाराजी जनतेत असेल तर. मंत्रिपद येतंय आणि जातंय, मुख्यमंत्री ज्यांचे आहे, ते येणार आहे, जाणार नाही. पर्मनंट कुणी नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कुणी मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नाही. आमची जबाबदारी उत्तम काम करणे आहे. आम्ही जाहीरपणे लोकांची भूमिका समजून घेणार आहे. जनतेचा प्रसाद कसा आहे, तो स्वीकारावा लागतो. पण दुख: आहे. कल्पना, योजना तयार केल्या होत्या. या भागातील हितासाठीच्या योजनांना रोख लागणार आहे.


मध्यंतरी त्यांची शक्ती कमी…बावनकुळेंना टोला

महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुनंगटीवारांची शक्ती पक्षाने कमी केलेली नाही. त्यांनी नाराज राहू नये, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मुनगंटीवार यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. बावनकुळे यांचे म्हणणे योग्य आहे. मध्यंतरी त्यांची शक्ती कमी झाली होती. तेव्हा त्यांना तसेच वाटत होते, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

Exit mobile version