Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना अजित पवार गटाच्या शरद पवार गटाच्या खासदारांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली त्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या खासदारांची खासदारकी रद्द करण्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं का वगळली? यात कोणताही संभ्रम नाही. त्याबद्दल त्यांनाच विचारा.
भारताला मोठं यश! नौदल अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध कतारने स्वीकारले भारताचे अपील
तसेच अजित पवार खासदारकी रद्द करण्यातून कोल्हेंच नाव वगळलं पण अमोल कोल्हे देखील आमच्यासोबतच आहेत. त्यांच्याशी आत्ताच संवाद साधला. त्यामुळे अमोल कोल्हे हे अजित पवार गटामध्ये आहेत असा ही अर्थ नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. तसेच यावेळी सुळे यांनी विद्या चव्हाण, फैजिया खान, श्रीनिवास पाटील तसेच इतर खासदारांच्या खासदारकी रद्द करण्याच्या मागणीवर आक्षेप घेतला आहे.
पवारांच्या जवळील व्यक्तींना टार्गेट करायला सुरूवात…
अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी शरद पवार गटाने केली. त्याला प्रत्युत्तर देत आता अजित पवार गटाने देखील शरद पवार गटाच्या काही खासदारांची खासदारकी रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहिले आहे. मात्र यामध्ये एक संभ्रमात टाकणारी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. कारण यामध्ये राज्यसभेमधील शरद पवार आणि लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं वगळून इतरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
CM शिंदे राजस्थान प्रचारात; आदित्य ठाकरेंनी घेरलं, म्हणाले, जिथून पगार मिळतोयं..,
तर या पत्रामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शरद पवार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये राज्यसभेतील वंदना चव्हाण आणि फौजिया खान, तर लोकसभेतील श्रीनिवास पाटील आणि फैजल मोहम्मद यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे जर विरोधच करायचा असेल तर अजित पवार आणि त्यांचा गट थेट पवार कुटुंबाविरोधात भुमिका घेत नसल्याचं दिसत आहे.