सगळ्या गोष्टी कॅमेरावर बोलता येत नाहीत… तनपुरेंच्या भाजपप्रवेशानंतर सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule

Supriya Sule

Supriya Sule on Prajakt Tanpures BJP Joining Not everything can said on camera : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात शनिवार 30 मे 2026 रोजी दुपारी तीन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. त्यावर शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापुर्वी ते काल मला ते भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांना हा प्रवेश का करावा लागतोय? या मागील त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टी कॅमेरावर बोलता येत नाहीत. मात्र पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असं म्हणत सुळे यांनी तनपुरेंच्या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

सुट्टा सोडा अन् सुट्ट्या घ्या! सिगरेट न ओढणाऱ्यांना मिळणार वर्षभरात अतिरिक्त 6 सुट्ट्या…

त्याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अहिल्यानगर जिल्ह्यात राम शिंदे सोडले तर भाजपचे सगळे नेते मूळचे काँग्रेसचे नेते आहेत. यादी काढून पहा भाजप हा पक्षच काँग्रेस युक्त आहे. जी 100 कुटुंब काँग्रेसमध्ये होती तीच आता भाजपामध्ये गेलेली आहेत. त्यामुळे या सगळ्या काँग्रेस नेत्यांना घेऊन भाजप काँग्रेस मुक्त भारत कसा बनवणार आहे? असा सवाल देखील यावेळी सुळे यांनी केला.

एकीकडे कर्डीले विजयी, दुसरीकडे तनपुरे भाजपमध्ये; विखेंचा डबल स्ट्राइक

राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा हा भाजप प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तनपुरेंचा हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी अहिल्यानगरचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांची देखील उपस्थिती होती.

Exit mobile version