Download App

अजितदादांना कसं ट्रॅक कराल?; सुप्रिया सुळेंनी दिली आयाडिया!

Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे. याबाबत आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आले असता, सुळे म्हणाल्या, मी तुमच्याच चॅनलवर मी अजित पवारांना नागपूरच्या महाविकास आघाडी सभेत पाहिलं. अजित दादांचे गॉसिप आणि त्यांचे लोकेशनसाठी मी तुम्हाला एक आयडिया देते की तुम्ही एक युनिटच लावा की दादा (अजित पवार) कुठं आहेत? अशा शब्दात सुळे यांनी अजित पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नांनाला उत्तरं दिले.

सध्या राजकीय वर्तुळात काहीतरी खळबळजनक होणार असे अंदाज नेतेमंडळी बांधू लागले आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. याबाबत काही नेतेमंडळी देखील उघड बोलू लागले आहे. यामुळे येत्या काळात अजित पवार हे राष्ट्रवादीला रामराम करत भाजपासोबत जाणार का? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे.

यातच नागपुरात पार पडलेल्या महविकास आघाडीच्या सभेदरम्यान देखील अजित पवारांनी भाषण केले नाही. यामुळे ते नाराज आहेत का अशा चर्चा रंगल्या. यातच आज सकाळपासून अजित पवार यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. आता याच अनुषंगाने सुप्रिया सुळे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजित पवार यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. याबाबत सुळे म्हणाल्या, बातम्यांच्या माध्यमातूनच मी अजितदादांना काल नागपुरात महाविकास आघाडीच्या सभेत पाहिलं. मला असं वाटत की, अजित दादांचे गॉसिप आणि त्यांचे लोकेशनसाठी मी तुम्हाला एक आयडिया देते की तुम्ही एक युनिटच लावा की दादा (अजित पवार) कुठं आहेत? असं मजेशीर उत्तर सुळे यांनी दिल.

दुबईतील इमारतीला भीषण आग, 4 भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, आज राज्यासमोर महत्वाचे विषय आहे. शेतकरी समस्यां, बेरोजगारी अशा समस्यां आहेत. अनेक महत्वाचे प्रश्न आमच्यासमोर आहे. याबाबत महविकास आघीडीमध्ये चर्चा देखील झाली. माझी देखील अजित पवारांशी चर्चा झाली. मात्र कोणी काही कार्यक्रम रद्द केले की म्हणून असे तर्क वितर्क लावणे योग्य नाही असे सुळे म्हणाल्या.

Tags

follow us