Suresh Dhas Serious allegations against Agriculture Department : भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे माजी मंत्री राहिलेल्या कृषी विभागावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी थेट कृषी अधिकारी आणि बोगस निविष्ठा कंपन्यांवर निशाणा साधत मुंडेंना टार्गेट केले आहे. यावेली बोलताना धस म्हणाले की, कृषी विभागाचे क्वालिटी कन्ट्रोल अधिकारी स्वत: चे काम सोडून हप्ते गोळा करत आहेत. कृषी केंद्र मालकांना हा माल घेण्यास दबाव टाकला जातो.
सीसीटीव्ही पुरावे समोर आणा, कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर महादेव गीतेच्या पत्नीचे गंभीर आरोप
कृषी विभागाचे क्वालिटी कन्ट्रोल अधिकाऱ्यांनी मोठ्या रक्कमा देऊन बदली करून घेतली आहे. त्यामळे ही रक्कम वसुल करण्यासाठी ते स्वत: चे काम सोडून हप्ते गोळा करत आहेत. हे अधिकारी तपासणी फी जास्त घेत आहेत त्यामुळे कृषी केंद्राचे मालक हे शेतकऱ्यांना बोगस कंपन्यांचा माल खपवत आहेत. त्यात याच अधिकाऱ्यांच्या किंवा त्यांच्या नातलगांच्या नावे या बोगस कृषी निविष्ठा कंपन्या असतात. त्यांच्याकडून कृषी केंद्र मालकांना हा माल घेण्यास दबाव टाकला जातो. असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं आहे.
विखे-थोरातांमध्ये आता नवा सामना; खताळांनाबरोबर घेऊन ‘गणेश’चा बदला घेणार
पुढे धस म्हणाले की, यावर मी विधान सभेच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडला होता. त्यावर मला कृषी अधितकारी स्वत: किंवा त्यांच्या नातलगांच्या नावाने कृषी कंपन्या असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. तर यातील सर्वात जास्त बोगस बियाणे कंपन्या या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये किरण जाधव या अधिकाऱ्याच्या 43 बोगस बियाणे कंपन्यांपैकी 11 कंपन्या होत्या. तसेच त्यांच्याकडून इतर कंपन्यांच्या परवान्यासाठी प्रचंड पैसा घेतला आहे. कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांनी पूर्ण सूट दिली आहे. असा आरोप धस यांनी केला आहे.