मुंबई : सोमवारी ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. मात्र, पोलिसांनी मारेकऱ्यांवर कुठलीच कारवाई केली नाही, उलट रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हे दाखल केले. त्यानंतर काल रोशनी शिंदे यांच्या समर्थनार्थ आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चोत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) जोरदार समाचार घेतला होता. त्यानंतर आज भाजपकडून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अशातच आता भाजपचे मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्यावर जोरदार जहरी टीका केली आहे.
मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सुषमा अंधारेंवर टीकास्त्र डागलं. त्यांनी सुषमा अंधारेची तुलना राखी सावंतशी केली आहे. कंबोज यांनी आपल्या मध्ये लिहिलं की, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी आहेत. एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहिण महाराष्ट्राच्या सिनेमामध्ये एकमेकींशी स्पर्धा करत करत आहेत की, रोज सगळ्यात जास्त सनसनाटी कोण निर्माण करेल, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.
सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्या ठाकरे गटाची तोफ बनल्या आहेत. त्या भाजप आणि शिंदे गटाचा कायम समाचार घेत असतात. त्यामुळं त्यांच्यावर कायम टीका केली जात असते. सुषमा अंधारेंनी कालच्या सभेत बोलतांना देखील राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. भक्तगणांचा चॉईसच फडतूस आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.
Gunaratna Sadaverte : खोड काही जाईना! सदन रद्द होऊनही सदावर्ते जैसे थेच
झुकेगा नही, घुसेगा साला हा डॉयलॉग भारीच आहे. पण, 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायलिंग करत होती. हे तुम्हाला 7 वर्ष कळलं नाही. आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात, हे पटत नाही, अशी पोस्टही त्यांनी केली. अंधारेंची ही पोस्ट व्हायल झाल्यानंतर आता कंबोज यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. खरंतर मोहित कंबोज हे कायम आपल्या ट्विटमुळे आणि विधानामुळं चर्चेत असतात. त्यांनी आताही एक ट्विट करून सुषमा अंधारेंची तुलना ही राखी सावंत सोबत केली.
ठाण्यातील मोर्चानंतर भाजप आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी करत जहरी टीका केल्यानं आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता सुषमा अंधारे या कंबोज यांच्या टीकेला काय उत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.