Download App

Satyajit Tambe : भाजप प्रवेशाचा सस्पेंस कायम

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (Nashik Graduate Constituency Election) अनेक वळणं घेत पार पडलीय. या निवडणुकीत विविध घडामोडी पाहायला मिळाल्या. सत्यजित तांबे (Satyajit Tambe)हे भाजपमध्ये प्रवेश (Join BJP)करणार का? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातचं आहे. सत्यजित तांबे यांनी देखील त्याबद्दल अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही. मात्र भाजपनं तांबेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वतोपरी तयारी केल्याचं दिसून येतंय.

सत्यजित तांबे यांच्या भाजपमधील प्रवेशावरुन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule)यांच्यापासून स्थानिक आमदार राम शिंदे (Ram shinde)यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushn vikhe patil), खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe patil)यांच्यासह भाजप कार्यकर्ते आग्रही असल्याचं दिसून येतंय. भाजपसह शिंदे गटानंही सत्यजित तांबे यांनाच मतदान केल्याचं सांगितलं जातंय. आता निकालानंतर सत्यजित तांबे यांचा विजय झाल्यास ते नेमका काय निर्णय घेणार हे देखील पाहावं लागणारंय. तांबे यांच्या विजयानंतर काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवरील निलंबणाची कारवाई मागे घेतली जाणार का हे देखील पाहावं लागणारंय.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना अहमदनगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी पाठिंबा दिल्याचं दिसून आलं. नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांचा विजय निश्चित असल्याचं भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी म्हटलं होतं. त्याचवेळी सत्यजित तांबे यांना भाजपात प्रवेशाची ऑफर (Offer to join BJP) देखील दिल्याचं पाहायला मिळालं. तांबे यांच्या समर्थनार्थ राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं.

मतदानाच्या दिवशी विखे पाटील म्हणाले की, सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे, अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंसाठी काम केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. भाजप कार्यकर्त्यांनी तांबेंसाठी केलेल्या कामाचा सत्यजित तांबे सन्मान ठेवतील अशीही आशा यावेळी विखे पाटील म्हणाले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी सत्यजित तांबे यांचा प्रचार सोशल मीडियातून केल्याचंही पाहायला मिळालं.

Tags

follow us