Download App

प्रक्षोभक वक्तव्यं करणाऱ्यांवर SC च्या आदेशानुसार कारवाई का होत नाही? पटोलेंचा संतप्त सवाल

Take strict action against those who disrupt law and order in the state, Nana Patole  : महाराष्ट्र (Maharashtra) हे कायद्याचे राज्य असून सामाजिक सलोखा (social interaction) राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे, मात्र गेल्या काही महिन्यांतील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसून येते. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न काही संस्था, संघटना करत आहेत. काही लोक प्रक्षोभक वक्तव्य करून वातावरण चिघळवत आहेत. राज्यातील वातावरण आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची भेट घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करून निवेदन दिले. शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री तथा प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, गजानन देसाई, प्रवक्ते निजामुद्दीन रैन, सुनील खांडगे आदींचा समावेश होता.

Balasaheb Thorat : मविआतील जागा वाटप ठरेना; पण थोरातांनी किती जागा जिंकू हेच सांगून टाकले

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, अहमदनगर, त्र्यंबकेश्वर येथे जाणीवपूर्वक राज्यातील सामाजिक एकात्मता बिघडवण्याचे काम करण्यात केले गेले. राज्यातील वातावरण बिघडवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणे ही राज्यासाठी चिंतेची बाब असून अशा कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे. काही संघटनांचे नेते प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अशी प्रक्षोभक भाषणे आणि विधाने करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्रात न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. राज्यातील पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा कट

त्र्यंबकेश्वरमध्ये धूप-उदबत्ती दाखवण्याच्या प्रकरणाला काही संघटनांनी मुद्दाम वादाचा रंग देऊन सलोखा बिघडवण्याचे काम केले. गावकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत गावात शांतता असल्याचे स्पष्ट केले असतानाही बाहेरील काही संघटना त्र्यंबकेश्वरला जाऊन चिथावणी देण्याचे व वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न करत आहेत. सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या आणि वातावरण चिघळवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिक लोकांवर आणि महिला आंदोलकांवर पोलिस बळाचा वापर केला गेला, ही बाब अत्यंत गंभीर आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. पोलिसांचा हा अत्याचार थांबला पाहिजे आणि आंदोलकांवरील आरोप मागे घेतले पाहिजेत. मुंबई-वडोदरा महामार्गासाठी जमीन संपादन करतानाही आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. हा अत्याचार थांबला पाहिजे आणि संबंधित पोलिसांवर कारवाई केली पाहिजे.

महिला आणि मुली बेपत्ता होणे चिंताजनक

आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण. महाराष्ट्रातून दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत, जानेवारी ते मार्च 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यातून सुमारे 5510 मुली बेपत्ता असल्याचे समजते. राज्यातून मुली आणि महिला गायब होत असताना राज्यकर्ते ‘केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्यात व्यस्त आहेत. हरवलेल्या मुलींच्या बाबतीत महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने योग्य ती पावले उचलावीत. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून ते कायद्याचे राज्य राहावे यासाठी योग्य ती पावले उचला, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

ठाकरे गटाच्या मॅरेथॉन बैठकांमध्ये मीठाचा खडा; अंधारे वादाने लागला ‘ब्रेक’?

वानखेडे यांना भाजप का पाठीशी घालत आहे?

सीबीआयने वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई सुरू केली असून त्यांच्या भ्रष्ट कारवायांचा तपास सुरू आहे. वानखेडे यांच्यावर प्रतिष्ठित लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचा आरोप आहे. वानखेडेचा सीबीआय तपास सुरू असताना गृहमंत्री फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे अनेक लोक वानखेडे यांना समर्थन देत आहेत. वानखेडे यांना वाचवण्यासाठी हे भाजपचे लोक का पुढे आले? वानखेडे हा भाजपचा कोण लागतो? सरकारी सेवेत असलेला समीर वानखेडे नागपुरात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात का जातो? तो कोणाला आणि का भेटला? याचा खुलासा करावा, असे नाना पटोले म्हणाले.

Tags

follow us