ठाकरे की शिंदे धनुष्यबाण कोणाचा? चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी रद्द

Thackeray vs Shinde : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेली शिवसेना कोणाची या कायदेशीर उत्तर मिळायला अजून वेळ जाणार आहे. कारण धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आज होणारी सुनावणी रद्द झाली आहे. कोर्टाच्या आजच्या कामकाजात शिवसेनेच्या प्रकरणाचा समावेश नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाबाबतच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून कोर्टात आव्हान दिलं होत. त्यावेळी पुढील सुनावणीसाठी 24 एप्रिल […]

Uddhav Thackeray & Eknath Shinde & supreme court

Uddhav Thackeray & Eknath Shinde & supreme court

Thackeray vs Shinde : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेली शिवसेना कोणाची या कायदेशीर उत्तर मिळायला अजून वेळ जाणार आहे. कारण धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आज होणारी सुनावणी रद्द झाली आहे. कोर्टाच्या आजच्या कामकाजात शिवसेनेच्या प्रकरणाचा समावेश नाही.

निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाबाबतच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून कोर्टात आव्हान दिलं होत. त्यावेळी पुढील सुनावणीसाठी 24 एप्रिल ही तारीख मागच्या वेळी ठरली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आजच्या कामकाजाच्या यादीमध्ये शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणाचा समावेश नाही. त्यामुळे पुन्हा चिन्ह आणि शिवसेना नावासाठी ठाकरे गटाला वाट पाहावी लागणार आहे.

निवडणूक आयोग म्हणतं आमचा निर्णय योग्यच

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाला आज आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने आयोगाला उत्तर मागितले होते.

 

निवडणूक आयोगाने न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. आयोगाने म्हटले आहे की, हा विचार करून घेतलेला निर्णय आहे. निर्णय देण्यापूर्वी ठाकरे गटाने  मांडलेले सर्व मुद्देही आम्ही ऐकून आणि समजून घेतले आहेत. यासोबत निवडणूक आयोगाचे म्हटले आहे की आयोगाने आपल्या अधिकाराच्या कक्षेत म्हणजेच अर्ध-न्यायिक क्षमतेत निर्णय दिलेला होता.

Exit mobile version