Chandrakant Patil : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद अक्षरशः विकोपाला गेला आहे. आता उद्धव ठाकरे आणि भाजपचा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सुरू झाला आहे. विशेषतः सोमवारी ठाणे येथील घटनेत शिंदें गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात भेट देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करत फडणवीस यांना फडतूस म्हटले. त्यामुळे भाजप आणि ठाकरे यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. याबाबत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं भाष्य केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणतात की, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा वाद म्हणजे कोंबडं आधी की अंडं आधी असा आहे. म्हणजे असं आहे की दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे सुसंस्कृत नाही. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे २०१४ पासून हा वाद सुरू झाला आहे. आधी शिवसेना विरोधात बसली. मग परत सत्तेत आली. नंतर २०१९ वाद झाला आणि वेगवेगळे झाले.
संजय राऊत यांनी पुन्हा राहुल कुल यांचे नाव घेतले… – Letsupp
आता हे प्रकरण असे झाले आहे की, देवेंद्र फडणवीस हे काही आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर करत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहे. हे सतत सुरू आहे. हे कितीही काही केले तरी थांबणार नाही. म्हणजेच काय तर जसे आपल्याला कोंबडं आधी की अंडं याचं उत्तर देता येत नाही. तसेच या प्रश्नाचं झालं आहे, असे उत्तर चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणतात की, गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारण अत्यंत खराब झाले आहे. महाराष्ट्राचं राजकारण असं कधीही नव्हतं. हे जे काही सुरू आहे ते सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे नाही. ही कटुता वैयक्तिक पातळीवर गेली आहे. कुठेतरी समंजस्य भूमिका घेऊन थांबले पाहिजे.
https://www.youtube.com/embed/cG5oywWBhJ4