तुतारी को कैसा हराया?; मुंब्र्यात MIM चा विजय, आव्हाडांच्या पायाखालची जमीन सरकली का?

Jitendra Awhad मुंब्र्यातून विजयी झालेली सहार शेखचे वडील युनूस शेख आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे.

तुतारी को कैसा हराया?; मुंब्र्यात MIM चा विजय, आव्हाडांच्या पायाखालची जमीन सरकली का?

तुतारी को कैसा हराया?; मुंब्र्यात MIM चा विजय, आव्हाडांच्या पायाखालची जमीन सरकली का?

Mumbra Sahar Shaikh Vs Jitendra Awhad : मुंब्रा नाव घेतलं की, पहिला चेहरा समोर येतो तो म्हणजे शरद पवार गटाचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांचा. पण, याच आक्रमक आमदार असणाऱ्या आव्हाडांच्या पायाखलची जमीन नुकत्याच जाहीर झालेल्या पालिका निवडणुकांच्या निकालानंतर सरकल्याची चर्चा आहे. कारण, आव्हाडांचा गड मानल्या जाणाऱ्या मुंब्र्यामध्ये MIM चे चारही उमेदवार नगरसेवक म्हणून निवडणून आले आहेत. या विजयानंतर आव्हाडांचे कट्टर विरोधक असणाऱ्या युनूस शेख यांची मुलगी सहार शेखने तुतारी को कैसे हराया? असे म्हणत आव्हाडांना डंख मारला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मुंब्र्यात जाऊन आव्हाडांना अवकात दाखवू, त्या वक्तव्यावरून अमोल मिटकरी संतापले

मुंब्र्याचा राजकीय इतिहास कसा?

आता आपण, मुंब्रा–कळवा विधानसभा मतदारसंघाचा एकूण राजकीय इतिहासावर नजर टाकली तर, 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे (NCP-SP) उमेदवार म्हणून मुंब्रा-कळवा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार होता आणि आव्हाडांनी सुमारे 96,000 च्या फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे मुंब्र्यातील वर्चस्व आव्हाडांनी कायम ठेवले, मात्र, यंदाच्या ठाणे महापालिका (TMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील आव्हाडांना जुन्या सहकाऱ्यांकडून आव्हान देण्यात आले.

आव्हाडांनी नाकारली होती उमेदवारी

मुंब्र्यातून विजयी झालेली सहार शेखचे वडील युनूस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. त्यात यंदाच्या महापालिका निवडणुकीत युनूस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे सहर शेख (Sahar Shaikh) ही एमआयएमकडून (MIM) निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि विजयीदेखील झाली. त्यानंतर आता विजयी सभेला संबोधित करताना सहर शेखने तुतारी को कैसे हराया म्हणत डिवचलं आहे.

आपण मांसाहारी लोकं, अचानक ब्राम्हणवाद कत्तलखाने बंदीवरून आव्हाड भडकले

स्थानिक राजकारणात मुंब्रा केंद्रस्थानी

मुंब्रा-कळवा या मतदारसंघात मुस्लिम समुदायाचे मोठे मतदान आहे, त्यामुळे स्थानिक राजकारणात हा भाग नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. मात्र, पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या मत विभाजनाचा एमआयएमला फायदा झाल्याचे उमेवारांना मिळालेल्या मतांवरून समोर आलयं. गेल्या निवडणुकीत एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले होते, त्यात आता दोनने वाढ झाली आहे.

मुंब्रा मतदार संघाचा पूर्व इतिहास बघितला तर, 2012–2017 राष्ट्रवादी आणि काँग्रेस समर्थित नगरसेवक निवडून आले. 2017–2022 मध्ये अपक्ष + स्थानिक गट तर, 2022 नंतर मुंब्र्यामध्ये महापालिका स्तरावर मतदार NCP MIM असा शिफ्ट झाल्याचे चित्र आहे. यामुळे या ठिकाणी MIM ची वाढती ताकद वाढल्याचे चित्र आहे. यामागे मुस्लिम मतदार वर्ग, युवक, झोपडपट्टी/नागरी या प्रश्नांचा समावेश आहे. याशिवाय प्रचार शैलीचा विचार केला तर, एमआयएमची शैली ही भावनिक आणि आक्रमक आहे. त्याशिवाय सहार शेख, युनुस शेख यासारख्या स्थानिक नेत्यांचे नेतृत्त्वही यंदाच्या विजयासाठी वरचढ ठरलयं.

Supriya Sule Exclusive : राष्ट्रवादीचं मनोमिलन ते आव्हाडांच्या आरोळ्या, राजकारण फिरवणारी मुलाखत

MIM vs NCP (आव्हाड) – तुलनात्मक चित्र

MIM vs NCP म्हणजेच आव्हाड यांच्यामध्ये तुलना केली तर, आव्हाड विधानसभेत मजबूत आहेत तर, त्या उलट MIM पालिका स्तरावर मजबूत आहे. राजकीय शैलीत आव्हाड वैचारिक आणि अनुभवी आहेत तर, एमआयएम आक्रमक आणि समुदाय केंद्रीत असल्याचे पाहण्यास मिळते. मतदारांचा विचार केल्यास आव्हाडांकडे मिश्र म्हणजेच मुस्लिम + दलित + सेक्युलर यांचा प्रामुख्याने समावेश आहे तर, त्या उलट एमआयएमकडे प्रामुख्याने मुस्लिम मतदारांचा भरणा आहे.

विधानसभा पातळीवर आव्हाडांची ताकद निर्णायक

हे चित्र झाले स्थानिक स्वराज्या संस्थाचे मात्र, विधानसभा पातळीवर आव्हाड यांची वैयक्तिक ताकद आजही निर्णायक ठरते. यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांवर नजर टाकली तर, 2009 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आव्हाडांच्या रूपाने मुंब्रा-कळव्यात NCP चा उदय झाला. त्यानंतर 2014 मध्ये मुस्लिम + दलित + सेक्युलर मतांच्या एकत्रीकरणाच्या जोरावर आव्हडांनी पुन्हा आमदारकीची माळ गळ्यात टाकली.

त्यानंतर 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-BJP विरोधी वातावरणाचा फायदा आव्हाडांना झाला अन् त्यांनी सलग तिसऱ्यांदा आमदारकीला गवसणी घातली. त्यानंतर 2024 च्या निवडणुकांमध्येही आव्हाडांनी त्यांची वैयक्तिक पकड कायम ठेवली. मात्र, दुसरीकडे त्यांच्याविरोधात स्थानिक असंतोष वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळतयं. सध्याच्या घडीला अजूनही मुंब्रा-कळव्यात विधानसभेसाठी आव्हाड किंगमेकर आहेत. पण, भविष्यात जर, MIM ने विधानसभेसाठी उमेदवार मजबूत केला, तर या ठिकाणी थेट लढत संभावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये MIM ला मिळालेल्या विजयामुळे आव्हाडांच्या पायाखालची जमीन सरकली असं म्हणणं चुकीचं ठरेल.

Exit mobile version