“सुप्रीम कोर्टाचा निकाल आता तरी सरकार त्यांचंच राहील. कदाचित मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही.” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणावर अनेक दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा दावा केला आहे. लवकरच राज्यतील मुख्यमंत्री बदलले जाणार असा दावा त्यांनी केला आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आगामी राजकीय गणितं अवलंबून आहेत.
https://letsupp.com/politics/how-can-another-person-sit-on-a-chair-when-one-person-is-sitting-on-it-38310.html
ते पुढे म्हणाले की म्हणाले, “१६ आमदारांची सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यात आहेत. ते मुख्यमंत्री पदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल. पण जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
याच मुद्दयांवर बोलताना ते पुढे म्हणाले की, न्यायालयाचा निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेलं तरी या सरकारला 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 गेले तरी 149 आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचंच राहील. मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही.
“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?
गेल्या काही दिवसापासून राज्यात अजित पवार राज्याचे मुखमंत्री होणार अशी चर्चा आहे. काही दिवसापूर्वी स्वतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्री व्हायला आवडेल. असं वक्तव्य केलं होत. त्यावर देखील भुजबळ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी एक तर मुख्यमंत्री पद खाली पाहिजे. नंतर संबंधित आमदारांचा सपोर्ट लागतो. ते अनेक वर्षात राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं सांगितलं तर काही चूक नाही.”