इलाका तुम्हारा, धमाका हमारा असं म्हणत अंधारेंनी शंभुराज देसाईंना डिवचलं

सातारा : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)यांच्या पाटण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी पालकमंत्री शुंभराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावरही टीका केली. यावेळी अंधारे म्हणाल्या की, शंभुराज देसाई यांचे मला कौतुक वाटते. इलाका तुम्हारा, धमाका हमारा, तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहे. […]

Sushma Andhare Shambhuraj Desai

Sushma Andhare Shambhuraj Desai

सातारा : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)यांच्या पाटण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी पालकमंत्री शुंभराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावरही टीका केली.

यावेळी अंधारे म्हणाल्या की, शंभुराज देसाई यांचे मला कौतुक वाटते. इलाका तुम्हारा, धमाका हमारा, तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहे. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबांनी स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला तुमच्या आजोबांचे विचार समजले नाहीत.

Sanjay Raut : मिंधे गटाला याची लाज वाटायला पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल

तुम्ही आपल्या आजोबांच्या नावाला काळीमा फासलाय. मी जे काही बोलत आहे, ते रेकॉर्ड करून खबऱ्यांनी देसाईंना पाठवावं, असं त्या म्हणाल्या. त्याचवेळी अंधारे म्हणाल्या की, शंभुराज तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? चाळीसजण रोज बडबडत आहेत. याचाच अर्थ महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली आहे, असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, शंभुराज देसाई हे सूड भावनेनं राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळात शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा कार्यर्त्यांनी निर्णय घेतलाय. त्यामुळं महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

Exit mobile version