नागपूर : काल छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) महाविकास आघातील नेत्यांवर टीकास्त्र डागलं. भाजपचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची, मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडल्याची टीका बावनकुळेंनी केली.
बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितलं की, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर हातातील मंत्रीपदे गेल्यानं अजित पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे यांचा तिळपापड झाला. त्यातूनच कालच्या सभेत त्यांची ही मळमळ बाहेर पडली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार या डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकास कामांना गती मिळाल्याचे पाहून बावचळलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांच्या नावाने शिव्याशाप देऊन कालच्या सभेत आपली निराशा व्यक्त केली. कालच्या सभेतील ठाकरेंचा आक्रोश पाहून ही बोंबाबास सभा होती अशी टीका त्यांनी केली.
उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे थोडक्यात बचावले, स्पीड बोटला अपघात!
यावेळी बोलतांना बावनकुळेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कालच्या भाषणात निव्वळ खोटारडेपणा होता. तुमच्या पक्षातील 40 लोक पक्ष सोडून निघूण जातात आणि तुम्ही पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करता, तुमची उंची तरी काय, असा सवाल त्यांनी केला. ठाकरे हे कधीही मोदी आणि शहा यांची बरोबरी करू शकत नाहीत. त्यांनी मोदींची इमेज कितीही खराब केली तरी जनता मोदींसोबत आहे.
उद्धव ठाकरे हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाहीत. त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी दगाबाजी केली. कालच्या सभेत उद्धव ठाकरेंना मोठी खुर्ची होती. अजित पवार, बाळासाहेब थोरात यांची खुर्ची लहान होती. अजित सत्ता गेली तरी अजूनही ठाकरेंचा राजेशाही थाट गेला नाही. दुसरा एखादा नेता असता तर लाल खुर्ची काढली असती. महाविकास आघाडीमध्ये खुर्चीची ओढल लागली आहे. ठाकरे हे आपली खुर्ची सोडालया तयार नाहीत. त्यांची राजा सारखी खुर्ची आणि ते उशीरा येणार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते त्यांची वाट पहात बसणार…. कालच्या या सभेत सोनिया गांधींचे फोटो नव्हते. अजित पवारांना तिसऱ्या-चौथ्या खुर्चीवर स्थान मिळालं, अशा शब्दात बावनकुळेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला डिवचंलं.