Download App

Mahrashtra Politics : दबावतंत्राचे राजकारण जनतेला रुचलेले नाही, राष्ट्रवादीचा निशाणा

  • Written By: Last Updated:

मुंबईः इंडिया टूडे, सी वोटर मूड ऑफ द नेशन या सर्वेक्षणात सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असे समोर आले आहे. त्यानंतर आता विकास आघाडीकडून भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationlist Congress) मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

तपासे म्हणाले, शिंदे फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा ४० च्या आसपास जाईल. आज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना हे मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दबावतंत्राचे राजकारण करून सरकार काबीज केले ते जनतेला रुचलेले नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील तेव्हा ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊन जाईल असेही महेश तपासे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची कामगिरी महाविकास आघाडी सरकारमध्ये उजवी ठरली होती. त्यामुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे यांना स्थान मिळवता आले मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना दहामध्येही स्थान मिळवता आले नाही याचा अर्थ जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट होत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.’सी वोटरचा’ जो सर्व्हे आला. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना फक्त दोन टक्के लोकांनी पसंती दिली, याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर हे उध्दव ठाकरे यांचे नवीन मित्र झाले आहेत. मात्र देशपातळीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांच्या मोर्चाचे शरद पवार हे नेतृत्व करत आहेत. जातीयवादाच्या विरोधातील हा मोर्चा असून यामध्ये पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य भाजपविरोधात असेल अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

Tags

follow us