Download App

Nana Patole : पुलवामामध्ये सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्यातील आरडीएक्स हे नागपुरमधून गेले

  • Written By: Last Updated:

The RDX in the Pulwama attack on the army convoy passed through Nagpur : महाविकास आघाडीच्य वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली आहे. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार निशाना साधला. पुलवामामध्ये सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्यातील आरडीएक्स हे नागपुरमधून गेले होते, असा खळबळजनक दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठकरे गटाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलतांनी पटोले यांनी सांगितले की, काश्मिकरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात सीआरपीएपचे 40 सैनिक मारले गेले होते. या जवानांचे मृत्यू हे मोदी सरकारचं अपयश आहे, असं म्हणत त्यांनी मोदींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, पुलवामामध्ये सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्यातील आरडीएक्स हे नागपुरमधून गेले होते. पुलवामा हल्यासाठी 300 किलो आरडीएक्स वापरण्यात आलं होतं, अस पटोले यांनी सांगितलं. ते म्हणाले की, ही जी काही स्फोटकं नागपूरमधून गेले, त्यासाठी आता सीबीआयची चौकशी लावावी. ही नागपूरमधून गेलेली स्फोटकं कुठून गेली? कुणी पाठवली? यावर अजून चौकशी झाली नाही.

Uddhav Thackeray : आनंदाच्या शिध्यातील कडधान्याला बुरशी लागली… मालिकांच्या आरोपांवर तोंड उचकटा!

गेल्या काही दिवसांपासून वज्रमुठ सभा होऊ नये यासाठी भाजपकडून कारवाया सुरू आहेत. यावर बोलतांना पटोलेंनी सांगितलं की, राज्यात ईडीच्या सरकारकडून या सभा होऊ नये यासाठी काळजी घेतली गेली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम परिसरात हिंदू धर्माचे मंदिर आहे. राम मंदिरात राम नवमीच्या दिवशी दोन्ही समाजाकडून कार्यक्रम आयोजित केला गेला. पण दहा-पंधरा मुलं गेली आणि त्यांनी वातावरण खराब केले. या दोन गटाच्या वादात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, असं पटोले यांनी सांगितलं.
ते म्हणाले, पण संभाजीनगरमध्ये सभाा झाली. नागपुरातील सभेलाही भाजपचा विरोध झाला. यासाठी जागेचा वाद निर्माण केला. कोर्टावपर्यंत वाद गेला. ही सभा होऊ नये, यासाठी भाजपने पुरेपुर प्रयत्न केले, असा आरोप पटोले यांनी भाजप एवढं का घाबरतं, असा खोचक सवालही केला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. यावर भाष्य करतांना पटोले म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं आणि राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारला बळीराजचं काही देणंघेणं उरलं नाही, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आम्ही सत्तेत असतांना शेतकऱ्यांना भरीव मदत केली. मात्र, शिंदे सरकारकडून बळीराजाला वाऱ्यावर सोडलं आहे, अशी टीका करत त्यांनी बळीराजाला आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं.

ते म्हणाले, 1 हजार कोटी जाहिरातीसाठी बजेट राज्य सरकारने ठेवले आहे. खरंतर जे सरकार चांगले काम करते, त्याना जाहिरात करण्याची गरज पडत नाही. तुटलेल्या बसेवर जाहिरात करण्यचाी गरज नाही, असं पटोले म्हणाले. नागपूरकरांना लुटलं जातं आहे. नागपूर हे सगळ्यात महागडं शहर आहे. शहरात भयावह परिस्थिती आहे. सरकारचा सर्वाधिक पैसा हा जाहिरातींवर खर्च केला जात आहे. जनतेच्या घामाच्या पैशाचा दुरूपयोग केला जातो. विकासाच्या नावाने नागपूरकरांना लुटण्याचे काम सुरू आहे, त्यांना पिण्याचे पाणी दिलं जातं नाही, असं पटोले म्हणाले.

Tags

follow us