The sadhus around Modi are not Brahmins; Bhujbal Criticis from Tawade : रविवारी नवीन संसद भवनाचा (New Parliament Building) उद्घाटन सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी पूजा आणि हवन करून पीएम मोदींनी सेंगोलच्या राजदंडपुढे नतमस्तक होऊन उपस्थित संतांचे आशीर्वादही घेतले. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी संसदेत उद्घाटनाच्या नावाखाली कर्मकांड झालं, अशी प्रतिक्रिया दिली. तर कुठूनतरी उघडेबंब लोक आणले होते, आणि संसदेत धर्मकांड झालं, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी केली होती. दरम्यान, आता भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा फज्जा उडाला आणि अंधश्रद्धा आणि धर्माला महत्त्व देण्यात आले. लोकशाहीच्या नावाखाली नव्या हुकूमशाहीचा राजदंड दिल्लीपर्यंत पोहोचला. त्यामुळे राजेशाहीची सुरुवात झाली. विज्ञान आणि संशोधनावर विश्वास नसलेल्या लोकांच्या गर्दीत मोदी होते, अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादीसह अन्य विरोधकांनी दिल्या.
विनोद तावडेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादीने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनवर धर्मकांड, कर्मकांड अशा प्रतिक्रिया दिल्या. मोदींच्या आजूबाजूला त्यांना साधू ब्राम्हण दिसतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदींचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोत मोदींच्या आजूबाजूला काही साधू ब्राम्हण दाखवले. मात्र, मोदींच्या आजूबाजूचे साधू ब्राह्मण नाहीत, ते कोणत्या जातीचे हे माहिती करा, असं तावडे म्हणाले.
कर्नाटकचा नाही, येथे उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला; राऊतांनी आघाडीच्या नेत्यांना ठणकावले!
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र या जयंती सोहळ्यादरम्यान, महाराष्ट्र सदनाच्या मध्यभागी असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यात आले. हे दृष्कृत्य अतिशय दुर्दैवी अससल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. त्यावरही तावडेंनी भाष्य केलं. सावित्रीबाई, अहिल्याबाईंचा फोटो हटवला, हे भुजळबळांना दिसलं. मात्र, ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचा फोटो त्यांना दिसला नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या संसद भवनात लिहिलेल्या आहेत. त्याही भुजबळांना दिसल्या नाही, असं तावडे म्हणाले.
यावेळी तावडेंनी केंद्रातल्या सरकारला 9वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण यासंदर्भात भाजप अभियान राबवणार असल्याचं सांगितलं. हे अभियान 30 जूनपर्यंत चालेल. 80 कोटी लोकांपर्यंत हे अभियान घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.