Download App

Jitendra Awhad : “… तर याचे परिणाम भोगावे लागतील” संभाजी राजे यांचा इशारा

  • Written By: Last Updated:

“मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.” असा इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरु झाला आहे. त्यावर संभाजी राजे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी राजे यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की, “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.”

नेमकं काय म्हणाले होते आव्हाड?

रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा. महाभारतातून दुर्योधन, कर्ण काढून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघलशाही काढून शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा असं ट्विट आव्हाड यांनी केलं होत.

शिंदे गट आणि भाजपाकडून आव्हाड यांच्यावर टीका केली जात असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान एका ट्वीटद्वारे आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करून तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हाड म्हणाले आहेत.

 

Tags

follow us