Download App

शिंदे गटाच्या बंडामागे भाजपचाच हात, ‘या’ भाजप नेत्याने दिली कबुली

जळगाव : ‘एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलंच. सारं जुळून आलं. घडून आलं.’ अशी कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

जूनमध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड झालं. नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. हा सर्व घटना क्रम आणि हे बंड कसं झालं हे सांगताना जूनमध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामागे भाजपचाच हात असल्याची कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

त्यामुळे आता या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामागे भाजपचाच हात असल्याची कबुली दिली.

यावेळी या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. तर जूनमध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाची त्यांनी यावेळी इत्थंभूत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, ‘एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. हे अवघड होत.’ असं देखील महाजन म्हणाले.

Tags

follow us