Download App

‘हा तर पोरकटपणा’, भावी मुख्यमंत्री पदावर Sharad Pawar थेट बोलले

  • Written By: Last Updated:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरुन बॅनर वॉर चालल्याचे पहायला मिळते आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांचे मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग लागले होते. याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हा निव्वळ पोरकटपणा आहे, अशा प्रकारचे कृत्य कुणी करेल का?, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे. एका पक्षातल्या तीन जणांचे होर्डिंग त्यातही एकाच कुटूंबातील दोन लोक असे कुणी करत नाही. आधी कुणी तरी चावटपणा केला त्यांनंतर आणखी एकाने तसेच केले, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग लागले होते. त्यानंतर काही दिवसातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व काल सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग लागले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे का अशी चर्चा रंगली आहे.

(‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागेल असे वाटत नाही’, Sharad Pawar यांचे वक्तव्य)

दरम्यान गेल्या काही दिवासांपासून पुण्यामध्ये एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी शरद पवारांनी त्या विद्यार्थ्यांची मध्यरात्री भेट घेतली होती. त्यामुळे विद्यार्थी आज त्यांना धन्यवाद देण्यासाठी आले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

Tags

follow us