Bhiwandi Politics : निवडणुकांमध्ये इतरांचा गेम करणाऱ्या भाजपचा काँग्रेसने भिवंडीत केला ‘खेळ’

Bhiwandi राज्यातील पालिका निवडणुकांमध्ये भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला तरी, अनेक ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत नव्हते.

Bhiwandi Politics : महापालिका निवडणुकांमध्ये इतरांचा गेम करणाऱ्या भाजपचा भिवंडीत गेम...

Bhiwandi Politics : महापालिका निवडणुकांमध्ये इतरांचा गेम करणाऱ्या भाजपचा भिवंडीत गेम...

Twist In Bhiwandi Mayor Election : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आल्याचे सर्वांनाच माहिती आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने मोठा विजय मिळवत दिलेल्या शब्दानुसार अनेक पालिकांमध्ये भाजपचा महापौरदेखील बसवला. पण, प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या पद्धतीने विरोधीपक्षांसह अनेक नेत्यांची गोची करणाऱ्या भाजपचाच मात्र, भिवंडी महापालिकेमध्ये गेम झाला आहे. नेमकं भिवंडी महापालिकेत काय घडलं त्याबद्दल जाणून घेऊया…

चौधरींच्या खेळीने भाजपची गोची

भिवंडी महापौर पदासाठी भाजपने काही दिवसांपूर्वी महापौर पदाकरीता उमेदवार म्हणून नारयण चौधरी यांचे नाव जाहीर केले होते. 5 फेब्रुवारी रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष रविकांत सावंत यांना एक पत्र पाठविले होते. त्यात चौधरी यांना महापौर पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. असे असतानाही चौधरी यांच्यासह भाजप नगरसेविका स्नेहा मेहुल पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे चौधरी नाराज झाले होते. महापौरपदाच्या शर्यतीतून वगळण्यात आल्यानंतर आता नगरसेवक नारायण चौधरींनी थेट भिवंडी महापालिकेत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे येथील राजकीय चित्र बदलले असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती झाली आहे. तसेच महापौर निवडणूक चुरशीची झाली आहे.

मित्रपक्षांच्या मदतीने भाजपचा महापौर

नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील निवडणुकांमध्ये भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला तरी, अनेक महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत नव्हते, त्यामुळे त्यांना महापालिकेत पक्षाचा महापौर बसवण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली, चंद्रपूरमध्ये तर, शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि चंद्रपूर महापालिकेत भाजपचा माहापौर झाला.

9 नगरसेवकांसह भाजप उमेदवाराची काँग्रेसशी हातमिळवणी

भिवंडी महापालिकेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या पण, त्यांना बहुमतासाठी 16 जागा कमी पडल्या. आम्ही भाजप आणि शिंदेसेना यांचा पाठिंबा घेणार नाही ही काँग्रेसची भूमिका होती. भाजप सोडून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आधी काँग्रेससोडून गेलेले नारायण चौधरी भाजपमध्ये गेले होते, मात्र आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत, एवढेच नव्हे तर, येतांना त्यांनीसोबतीला 9 नगरसेवकांची फौजदेखील आणली आहे. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटानेदेखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे, त्यांचे बारा नगरसेवक असल्यामुळे आता काँग्रेसकडची संख्या 42 झाली आहे.

भिवंडीत भाजपचाच गेम

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार नारायण चौधरी व त्यांचे सहकारी मिळून भिवंडीत महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठता येतोय. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आज व्हिपदेखील जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये नारायण चौधरी यांना महापौर तर, काँग्रेसचे तारीक मोमीन यांना उपमहापौर पदासाठी मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संख्याबाळासाठी अन्य पक्षांची फोडाफोडी करून सत्तेत बसणाऱ्या भाजपच्याच महापौरपदाच्या उमेदवाराने एकदिवस आधी 9 नगरसेवकांसह काँग्रेसला पाठिंबा दिल्याने अन्य पक्षांचा गेम करणाऱ्या भाजपचाच भिवंडीत गेम झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भिवंडीत कुणाकडेच संख्याबळ नाही

भिवंडी महापालिकेत येत्या 20 तारखेला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या महापालिकेत देखील कोणाकडेही बहुमत नाही, इथे काँग्रेसकडे 30 नगरसेवक आहेत, तर भाजपाकडे 22 आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडे प्रत्येकी 12 नगरसेवक आहेत. अशा स्थितीमध्ये भिवंडीमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस पहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता, त्यामुळे काँग्रेसकडून या सर्व नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर या सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र आता भिवंडीमध्ये भाजपचे 9 नगरसेवक हे काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे भाजपच्या व्हिपच्या विरोधात जर, मतदान झाले तर, भाजपाकडून विरोधात मतदान करणार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version