Satyajit Tambe : तांबेंकडे दोन कोरे एबी फॉर्म पाठवले, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाचा एबी फॉर्म (AB Form) मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांना कॉंग्रेसकडून दोन कोरे एबी फॉर्म देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली. नाना […]

Untitled Design (81)

Untitled Design (81)

मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाचा एबी फॉर्म (AB Form) मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांना कॉंग्रेसकडून दोन कोरे एबी फॉर्म देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली.
YouTube video player
नाना पटोले म्हणाले की, कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना दोन कोरे एबी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले, त्यात सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) फॉर्म देऊन भरता आला असता, तो फॉर्म भरताना देखील कोणाला बोलावले नाही अशी खदखद नाना पटोले यांनी व्यक्त केली. फॉर्म भरण्याची परंपरा तांबेंनी मोडीत काढली आहे, फॉर्म भरण्यासाठी आपण साधारण अनेक कार्यकर्त्यांना बोलावण्याची परंपरा आहे. फॉर्म भरताना त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंबचं होतं. फॉर्म भरुन बाहेर आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी भाजप नेत्यांची नावं घेतली आहेत की मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची मदत घेणार आहे. सत्यजित तांबे यांनी त्यांची नावं घ्यायला नको होतं, पण त्यांनी ती नावं घेतली आहेत, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय.

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबितही करण्यात आलंय.

Exit mobile version