Download App

नीलम गोऱ्हे अपात्र होणार का? अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ‘गोऱ्हे अपात्र…’

  • Written By: Last Updated:

Anil Parab On Neelam Gorhe : राज्यातील आमदारांच्या अपात्रतेची कारवाई लांबवल्यांनं ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर कोर्टाने जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर नार्वेकर यांच्यासमोर आजपासून सुनावणी सुरू झाली आहे. त्यासाठी विधिमंडळाने ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी सुनावणीचं प्रारूप आणि रुपरेषा स्षष्ट केली जाण्याची शक्यता आहे. अशातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) याही अपात्र व्हायला पाहिजेत, अशी मागणी उबाठाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर ठाकरे गटाने त्यांच्या उपसभापती पदावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी उपसभापती पदावर नीलम गोऱ्हेच कायम राहणार असल्याचा निर्णय तालिका सभापतींनी घेतला होता. दरम्यान, आता अनिल परब म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे ह्या अपात्र व्हायला पाहिजे. कारण, जो नियम बाकी आमदारांना लागू होतो, तोच नियम नीलम गोऱ्हेंनाही लागू होणार आहे. गोऱ्हेंनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. त्यामुळं कायद्यानुसार, दहाव्या शेड्युलमधल्या २ अ नुसार जी अपात्रतेची तरतूद आहे, तीच गोऱ्हेंनाही लागू होईल, असं परब म्हणाले.

शरद पवारांची साथ सोडण्यासाठी दोन नेत्यांच्या ऑफर्स; भाजपकडूनही थेट…; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट 

ते म्हणाले, विधानपरिषदेच्या सभापतींची जागा रिक्त असल्याने उपसभापतीकडे सर्व कारभार असतो. उपसभापतींवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असल्यानं त्यांची सुनावणी कोण घेणार? त्यासाठी तातडीनं सभापतींची निवड घ्यावी लागेल. शिवाय, उपसभापतींविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असल्याने अन्य आमदारांची सुनावणी घेऊ नये, असंही परब म्हणाले.

शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांनी बंडखोरी केल्याने सेनेत फूट पडली आहे. यानंतर ठाकरे गटाने शिंदे समर्थक आमदारांविरोधात याचिका दाखल केली होती. या शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवावं, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती. 14 सप्टेंबर रोजी अपात्रतेबाबत सुनावणी झाली. मात्र, त्यावेळी नार्वेकर यांनी सुनावणी पुढे ढकलली. यानंतर ठाकरे गटाने नार्वेकरांवर वेळ मारून नेल्याचा आरोप केला. दरम्यान,आता सुनावणी सुरू झाली असून नीलम गोऱ्हे अपात्र होणार का, हेच पाहणं महत्वांचं आहे.

 

Tags

follow us