Download App

‘अजितदादांनी आपली विचारधारा बदलली तर आम्हाला काही…’ उदय सामंतांनी थेट सांगितले

Uday Samant on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांनी विचारधारा बदलली आणि आमची विचारधारा स्वीकारली तर आम्हाला काही अडचण नाही. जो निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतील त्यासोबत आम्ही राहु, असे सामंत यांनी म्हटले आहे.

उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आल्यास काहीच अडचण नसल्याचे सूचीत केले आहे. उदय सामंत म्हणाले की अजित पवार यांनी विचारधारा बदलली तर ते आमच्या सोबत येण्यास आम्हाला अडचण नाही. अजित पवार उत्तम प्रशासक आहेत. त्यांनी विचारधारा बदलली तर जो निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील त्यासोबत आम्ही राहु. अजित पवार आमच्या सोबत आल्यास आम्हाला काही अडचण नसल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

‘राजकारणी अनेक ठिकाणी मारतात डोळे, त्यांचे त्यांनाच माहित’ ; अमृता फडणवीसांचा रोख कुणाकडे ?

शिंदे-फडणवीस सरकार पडणार अशी टीका विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की स्वतःचे कार्यकर्ते स्वतःबरोबर टिकले पाहिजे, आमदार स्वतःबरोबर टिकले पाहिजे, त्यामुळे सरकार सोमवारी पडणार आहे, पुढच्या महिन्यात पडणार आहे, दिवाळीला पडणार आहे, शिमग्याला पडणार आहे असं विरोधक बोलत आहेत पण त्यांनी 25 वर्ष सांगत राहावं, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले की संजय राऊत यांचा एपिसोड ९ ते ९:३० असतो. हे जनतेला माहित आहे. चांगल्या कामाला आल्यावर असे काही अशुभ विचारु नये, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांना लगावला.

Tags

follow us