ठाकरे बंधू मुंबई जाम करणार ! वर्षभरात किती वेळा एकत्र आलेत ?

Uddhav Thackeray and Raj Thackeray येत्या रविवारी दोघेही बंधू एकत्र येणार आहेत. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढणार आहे.

Raj Thackery And Uddhav Thackery

Raj Thackery And Uddhav Thackery

Uddhav Thackeray and Raj Thackeray : नीट परिक्षेचे पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा फायदा उचण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष घेतायत. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे मैदानात उतरणार आहेत. येत्या रविवारी दोघेही बंधू एकत्र येणार आहेत. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढणार आहे. या मोर्चात कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे. तर महाविकास आघाडीचे इतर पक्ष मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यात मुंबई ठाकरे बंधूंची ताकद दिसेल आणि पक्षाला जनाधार मिळू शकतो. पण ठाकरे बंधू वर्षभरात कधी-कधी एकत्रित आले आहेत. ते पाहुया…

उद्धव व राज ठाकरे यांच्यात 2005 मध्ये दुरावा निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. सुरुवातीला विधानसभेला, नाशिक, मुंबई महानगरपालिकेला राज ठाकरे यांना यश मिळाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष टिकून ठेवला होता. पण गेल्या वर्षी दोघांनाही एकमेंकाची गरज जाणून लागली. त्यातून मराठीच्या मुद्द्यांवर दोघे 1 जुलै 2025 मध्ये एकत्र आले. मुंबईत जवळपास दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि राज्यातील भाषा धोरणाच्या विरोधात आयोजित या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही नेत्यांनी मराठी माणसाच्या हक्कांवर भर देत एकत्रित लढण्याचा संदेश दिला. या सभेला महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक वळण मानले गेले.


शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मारकाला संयुक्त अभिवादन

दोघांच्या संयुक्त सभेपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे यांनी कुटुंबासह शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला अभिवादन केले. अनेक वर्षांनंतर दोघे एकत्र आल्याने हा भावनिक क्षण ठरला आणि त्यांच्या नात्यातील दुरावा कमी झाल्याची चर्चा रंगली.


गणेशोत्सवातील भेट, उद्धव ठाकरे राज ठाकरेंना भेटण्यासाठी

2025 च्या गणेशोत्सव दोघांसाठी महत्त्वाचा ठरला. कारण उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे आणि कुटुंबीयांसह राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गणपती दर्शनासाठी गेले होते. या भेटीनंतर दोन्ही पक्षांमधील राजकीय जवळीक वाढत गेली.


बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुन्हा एकत्र

नोव्हेंबर 2025 मध्ये शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकावर त्यांच्या स्मृतिदिनी दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आले. संयुक्त सभेनंतर सार्वजनिकरीत्या एकत्र दिसण्याची ही आणखी एक महत्त्वाची घटना होती.


मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढले पण…

दोघे बंधू अनेक वेळा एकत्र आले, परंतु राजकीयदृष्ट्या दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेत युतीत पहिल्यांदा लढले. मनसे-शिवसेना युतीने महायुतीला चांगली फाइट दिली. पण महानगरपालिकेत सत्तांतर झाले आणि ठाकरेंच्या हातातून सत्ता गेली. ठाकरेसेनेचे 65 नगरेसवक निवडून आले. पण मनसेचे सहाच नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुकीनंतर दोघांनी नीटचा प्रश्नावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची रविवारी पुन्हा एकदा ताकद दिसणार आहे.

Exit mobile version