Uddhav Thackeray On Sudhir Mungantiwar : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकाची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष तयारीला लागले आहे. यातच आज पुण्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ठाकरे यांनी यावेळी शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरून भाजप नेते मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुनगंटीवार म्हणतात की शिवाजी महाराजांची वाघनखे आणली. त्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता की नाही माहीत नाही पण त्या वाघनखांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा होता. ही वाघनखे मुनगंटीवारांनी आणलीत. वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतय का? अशी टीका ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना मुनगंटीवार यांच्यावर केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वाघ नखा मागे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून त्यास महत्व आहे. वाघाचा नखामागे वाघ पाहिजे हे सुधीर मुनगंटीवार यांना जमते आहे का? खरी वाघ नखे ही महाराष्ट्राची जनता आहे. आमच्याकडे खरा वाघ आहे हे त्यांनी विसरू नये असे ही ठाकरे म्हणाले. तसेच अमित शाह यांना आजपासून मी अब्दाली म्हणणार कारण मला ते औरंगजेब फॅन क्लब सदस्य म्हणता.
पावसाचे थैमान झाले की महारष्ट्रमध्ये भगवे थैमान येईल. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीवर इतके वळ उठतील की परत वळवळ करणार नाही असा इशारा देखील ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.
कोर्टाला आमची शेवटची विनंती..
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार अपात्र सुनावणीवर देखील भाष्य केले. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी फक्त आमची नाही. आमदार अपात्रेचा निकाल अद्याप लागलेला नाही. न्याय मिळवण्यासाठी विलंब होत असेल तर आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ असेही यावेळी ठाकरे म्हणाले.
तुम्ही मत विकत घेत आहात?
लाडकी बहीण योजनेवरून देखील उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही लाडकी बहीण योजना देऊन मत विकत घेत आहेत? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. मात्र हे लक्षात घ्या महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. भिकेवर जगणारा महाराष्ट्र नाही. 1500 रुपयात घर चालवणार आहात का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
‘आम्ही रिझल्ट देण्याचे काम करतो मात्र नकारात्मक प्रचार करणारे…’, जगतापांचा विरोधकांवर हल्लाबोल
तर ज्यांनी हक्काचं मागितल तर त्यांच्या मागे तुम्ही ED आणि CBI लावतात. हेच मोदी आणि शाह यांचे धोरण आहे. म्हणून हा लढा उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचा नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे असं म्हणत यापुढे लढाई मैदानात होणार, हॉलमध्ये होणार नाही असं आव्हान देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.