Download App

उद्धव ठाकरेंनी भावना गवळी आणि संजय राठोडांना धुतलं; काय शिंपडलं की तुम्ही स्वच्छ दिसू लागले?

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पोहरादेवी येथे आयोजित सभेत बोलताना सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यावरही निशाणा साधला. आधी भाजपने भावनाताई गवळींवर (Bhavana Gawali) भ्रष्टाचाराचे आरोप केले. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत आला, त्यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधताच त्यांच्यावरील आरोपांची चौकशी थांबली. तुम्ही त्यांच्यावर काय शिंपडलं की, त्या स्वच्छ दिसू लागल्या अन् तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला लागल्या, असा सवाल त्यांनी केला. (Uddhav Thackeray criticizes MP Bhawantai Gawli and Minister Sanjay Rathore)

उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी पक्ष बांधणीसाठी कंबर कसली असून आज पोहरादेवी येथे सभा झाली. या सभेला संबोधित करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने कायम विरोधकांच्या मागे ईडीचा समेमिरा लावून दुसऱ्यांची घरं फोडण्याची कामं केली. इथल्या आमदार आणि खासदार अशा दोघांवरही आरोप होते. आपल्या खासदार ताई भ्रष्टाचाराचे आरोप होताच पळाल्या होत्या. मग एक दिवस भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खासदारानं पंतप्रधांना राखी बांधली. ही खासदार भ्रष्ट आहे, असं आरोप भाजपच्याच दलाल लोकांनी केले होते. त्याच खासदार महिलेच्या हातून पंतप्रधानांनी राखी बांधू्न घेतली. नंतर त्या शिंदे गटात गेल्या…आता त्यांच्यावरी आरोपाच काय झालं? असा सवाल त्यांनी केलाय.

हे त्रिशूळ सरकार नसून एक फुल्ल दोन हाफ…; ठाकरेंचा हल्लाबोल 

ते म्हणाले, मी आता ठरवलं आहे, ज्या ज्या शिवसैनिकावर ईडी, सीबीआय चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले आहे, त्या सगळ्यांना मी खासदार ताई आणि जो आरोप करतोय, त्या दलालाच्या घरी पाठवणार आहे आणि विचारयला लावणार आहे की, ज्यांच्यावर तू भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यावर काय शिंपडलेस की ते स्वच्छ दिसू लागले आणि तुमच्या मांडीला मांडील लावून बसलायला लागले.

ठाकरे म्हणाले, मी इथल्या एका आमदाराला मंत्री केलं होतं. त्या मंत्र्यावर भाजपने आरोप केले होते. मग आता दोनशे रुपये हफ्ता घेणाऱ्याला तुम्ही मंत्री का केलं? असा सवाल करत संजय राठोड आणि भापजवर हल्लाबोल केला. दरम्यान, आपला पक्ष अजून भापज पक्ष झाला नाही. भाजपचा आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला, अशी टीकाही त्यांनी केली.

Tags

follow us