‘हिटलरने स्वतःला गोळी घातली’; तशी वेळ येऊ नये, भाजपने लक्षात ठेवावं, उद्धव ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray Garjana Morcha:मुंबईतील गर्जना मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करत गंभीर इशारा दिला.

Uddhav Thackeray Garjana Morcha

Uddhav Thackeray Garjana Morcha

Uddhav Thackeray Garjana Morcha: मुंबईतील गर्जना मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप (BJP) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करत गंभीर इशारा दिला. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी आणि निवडणूक आयोगाच्या (election commission of india) कारभारावरून सरकारला लक्ष्य करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना भविष्यातील परिणामांची जाणीव करून दिली. यावेळी हिटलरचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका मांडली.

भाजपने पत्ते उघडले! विधानपरिषदेसाठी तीन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

“आज लोकं शांत आहेत. उद्या जर लोकं पेटली, तर तुमचं सिंहासन जाळून खाक करतील. इतिहासात हिटलरने खुप नरसंहार केला होता. तो कोणाचंच ऐकत नव्हता, नंतर हिटलरवर अशी वेळ आली की, त्याला स्वतःला गोळी घालावी लागली.  त्याच्या पापात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना शोधून-शोधून फासावर चढवलं. काहींना तुरुंगात सडवलं. तो क्षण उद्या आपल्या देशात आल्याशिवाय राहणार नाही, हे भाजपने आणि त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं.” असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.

Garjana Morcha : ‘जो डाले वोट पे डाका, उसका नाम ज्ञानू काका’, अनिल देशमुखांची डायलॉगबाजी

उद्धव ठाकरे यांनी यावेळी सत्तेचा वापर आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांनी लोकशाही व्यवस्थेतील संस्थांचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. जनतेच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं.

दुष्काळाने घेरलं, नापिकीने मोडलं; मुलीच्या लग्नाची चिंता, शेतकऱ्याने टोकाच पाऊल उचललं

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काढण्यात आलेल्या या गर्जना मोर्चात विरोधी पक्षातील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान पक्षांचे झेंडे न घेता केवळ तिरंगा घेऊन सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रातील एसआयआर रद्द करणे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे, या प्रमुख मागण्या मोर्चातून मांडण्यात आल्या.

Exit mobile version