Download App

जसं जालियनवाला बाग काडं झालं, तसं ‘जालन्या’वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

  • Written By: Last Updated:

UBT sabha jalgaon : जालन्याच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्च केला. कित्येक जण जखमी झाले. काय चुकलं होतं त्याचं? आंदोलक शांतेतेने उपोषन करत होते. मात्र, जालन्यात शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम होणार होता. म्हणून हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीचार्च केला. जसं जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तसं जालन्यावाला कांड झालं. सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, अशा शब्दात उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

आज ठाकरे गटाची जळगावात सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, आंदोलक अतिरेकी आहेत,असं समजून पोलिसांनी लाठीचार्च केला. ही राक्षसी वृत्ती आहे. ज्या बंदुका काश्मिरमधे वापरल्या जातात त्या बंदुका तुम्ही नागरिकांसाठी वापरल्या…. येथील कोणते पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी सांगावं तुमच्या मनाप्रमाणे शांततेत चाललेल्या एखाद्या आंदोलनात तुम्ही ताफा घुसवू शकात का, असा सवाल ठाकरेंनी केला.

पाकिस्तानचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; राहुल-बुमराहचं कमबॅक, पाहा प्लेइंग इलेव्हन 

मराठा आंदोलनात मनोज जरंगे यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. मात्र मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. जसा अमानुष अत्याचार जालियनवालामध्ये झाला, तसाच आता नवा जालनावाला घडवला आहे, असं म्हणत जालन्यातील लाठीचार्ज घटनेची तुलना जालियनाला बागेशी केली. मोदींना संसदेचं विशेष अधिवेशन बोलावल. यात यात आमच्या धनगर, मराठा समाजाचे प्रश्न सोडवावा, असं ठाकरेंनी ठणकावलं.

ते म्हणाले, काही लोक बेडूक उड्या मारून भाजपात गेले. आता भाजपमध्ये राहिलं तरी कोण? भाजपमध्ये सगळे आयाराम आहेत. फडणवीसांनी पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धीच संपवले. सध्या भाजपमध्ये कर्तृत्वशुन्य लोक आहे. भाजपने शिवसेनेचा वापर केला. ज्या वेळी तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात लावला, त्याच वेळी ठरवलं, तुम्हाला मशालीची आग दाखवायची. आजवर तुम्ही आमची दोस्ती अनुभवली. आता मशालीची धग आम्ही तुम्हाला दाखवून देणार, असा इशारा ठाकरेंनी दिला.

Tags

follow us

वेब स्टोरीज