Uddhav Thackeray On Eknath Shinde: शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (
Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच बंडखोरी करणाऱ्या खासदारांना काही प्रश्न विचारले आहेत.
एक खासदार प्रेमाच्या एका रुपयाने निवडणूक जिंकला होता. समोरून पैशाचा महापूर होता. गरिब माणसांनी पैसे देऊन खासदार म्हणून निवडून आणले होते. कुठे फेडताल हे पाप. लोकसभेत तुम्ही खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांचे नाव घेतल्यानंतर तुम्ही काय म्हणाला होता ? ते आठवा. चारशे वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांना किती वर्षी लागतील हा शिक्का कधी पुसविण्यासाठी, असा सवाल ठाकरे यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांना विचारला आहे.
ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे
वडिलांनी दिलेली देणगी कोणी हिरावून घेणार नाही. आजच्या वर्धापनदिनी खचून गेलेला शिवसैनिक नाही, तर पेटलेला शिवसैनिक आहे. चार खासदारांचा सत्कार केला आहे. वीस आमदार, अनेक नगरसेवक आपल्याबरोबर आहेत. संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्याबरोबर आहे. आज भाजपकडे दोन-तृतियशं बहुमत नाहीत. त्यांचे सगळे काँग्रेस व इतर पक्षातील खासदार आहेत.
आज परत फोडा-फोडा कशासाठी ?
लोकसभेला सभा घेतल्या म्हणून तुम्ही निवडून आला आहेत. मिंधेसेना भाजपमध्ये विलिन होण्याचा धोका आहे. मोदींचा चेहरा न वापरता नऊ खासदार निवडून आणले आहेत. भाजपचे वीस खासदारांचे नऊ खासदार झाले आहेत. त्यामुळे आज परत फोडा-फोडा सुरू केली आहे. सत्तापिपासूपणा कशासाठी, असा सवाल ठाकरे यांनी विचारला.
भामटेगिरी करण्यापेक्षा आम्हाला बोलवा-ठाकरे
तोडून-फोडून भामटेगिरी करण्यापेक्षा आम्हाला बोलवा आणि आम्ही पाकिस्तानमधून आलेले नाहीत. आमच्या घराण्याचे इतिहास आहे. तुमच्या घराण्याचा इतिहास आहेत. आम्हीही देशप्रेमी आहोत. तुमच्यापेक्षा काकणभर जास्त देशप्रेमी आहेत. आज आपल्याला विरोध करत आहे, त्यांनी शिवसेनाप्रमुखाला विरोध केला होता. पण तेव्हा त्यांची गरज होती. माझ्या आजोबाला विरोध करणाऱ्या गोमूत्रधारी होते. ही प्रवृत्त आता बोकाळायला लागली आहे. भेसळयुक्त रक्त भगवा हातात घेऊ शकत नाही. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. देशातील लोकांना वाटते लोकशाही धोक्यात आली आहे. निवडणुकीत मेहनत तुम्ही केली आहे. जाब विचारणाचा अधिकार तुम्ही का सोडत आहे. आता विचारा जाब, असे आवाहन ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.
काँग्रेस शब्दाला जागली-ठाकरे
मातोश्रीला बदनाम करायला निघाले आहे. काँग्रेस तुमच्या हिंदुत्वापेक्षा बरी आहे. कारण काँग्रेस शब्दाला जागली आहे. तुम्ही पक्ष संपायला निघाले आहे. ज्या पक्षाचे बोट धरून मोठे झाला आहेत. तुम्ही गाडले गेले असते तर तुम्ही संपले असतात. मी खचणारा नाही. मी पळणारा नाही, पहाडासारखे उभे राहणार आहे. जबाबदारी स्वीकारणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.
