Download App

हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात; राहुल गांधींवरील कारवाईवर ठाकरेंची प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackery Reaction On Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मोदी आडनावावर टीका केल्याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनवली आहे. या प्रकरणात सध्या राहुल गांधी यांना जामीन देण्यात आला असून, राहुल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधींवरील कारवाईनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

https://letsupp.com/national/rahul-gandhis-candidacy-was-canceled-due-to-this-law-what-is-the-representation-of-the-people-act-70-years-ago-27388.html

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करणे ही थेट लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. या कारवाईनंतर देशभरातील आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे या सर्व घडामोडींनंतर काँग्रेसतर्फे चार वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहे. यात काँग्रेस नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://letsupp.com/national/veteran-leaders-from-lalu-prasad-yadav-to-jayalalithaa-had-to-lose-mlas-and-mps-27401.html

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहूल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. “राहुल गांधी यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा झाला आहे. चोर, दरोडेखोर अजूनही मोकळे आहेत आणि राहुल गांधींना शिक्षा झाली आहे. ही सरळसरळ लोकशाहीची हत्या आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहे. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. आता लढ्याला योग्य दिशा द्यावी लागेल.

काँग्रेसची भूमिका काय?

राहुल गांंधींवरील कारवाईनंतर देशभरतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज सायंकाळी ५ वाजता काँग्रेस मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली असून, त्यामध्ये हा लढा पुढे नेण्याची रणनीती ठरवली जाईल. तर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, आम्ही ही लढाई कायदेशीर आणि राजकीय पद्धतीने लढू. आम्ही धमक्यासमोर झुकणार नाही आणि गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले.

 

Tags

follow us