अफजलखान जसा महाराष्ट्रावर चालून आला तसे उद्धव ठाकरे खेडवर चालून आले; रामदास कदम यांचा हल्लाबोल

अफजलखान जसा महाराष्ट्रावर चालून आला तसे उद्धव ठाकरे योगेश कदम यांना संपवण्यासाठी खेडवर चालून आले, याच उत्तर १९ तारखेला मिळेल. असं रोखठोक हल्लाबोल शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्या दि. १९ मार्च रोजी खेड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने रामदास कदम बोलत होते. काही दिवसापूर्वी […]

ramdas kadam & uddhav thackeray

ramdas kadam & uddhav thackeray

अफजलखान जसा महाराष्ट्रावर चालून आला तसे उद्धव ठाकरे योगेश कदम यांना संपवण्यासाठी खेडवर चालून आले, याच उत्तर १९ तारखेला मिळेल. असं रोखठोक हल्लाबोल शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्या दि. १९ मार्च रोजी खेड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने रामदास कदम बोलत होते.

काही दिवसापूर्वी खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्याचे आव्हान योगेश कदम यांनी स्वीकारले आहे, कारण त्यांना राजकारणातून संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे यांनी उचलला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की याच्याआधी उद्धव ठाकरे यांनी संजय कदम यांना तीन वेळा मातोश्रीवर बोलावलं होत. पण माझ्या दबावामुळे त्याला ते तिकीट देऊ शकले नाही. ठाकरे यांनी योगेश कदम यांना तिकीट दिल आणि पाडण्याचा प्रयत्न केला. असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला.

लाँगमार्च आंदोलन : Eknath Shinde शेतकरी, आदिवासींना काय म्हणाले…?

गुहागर मध्ये मी गाफील होतो, म्हणून माझा तिथे पराभव झाला पण आता दापोली मध्ये आम्ही गाफील नव्हतो. उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना योगेश कदम यांचा पराभव करण्यासाठी पाठवलं, पण ते यशस्वी ठरले नाहीत. असं ते यावेळी म्हणाले. खेडमध्ये सभेसाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभरातून लोक आणले पण आम्ही फक्त मतदार संघातून लोक आणून त्यांच्या पेक्षा मोठी सभा घेऊन दाखवू असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं.

सभेचा टिझर जारी

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी ट्विटद्वारे या सभेची माहिती देत टिझर पोस्ट केला आहे. शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा. असं लिहीत योगेश कदम यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

Exit mobile version