Download App

‘मातोश्री’वरील SRPF सुरक्षा काढून घेतली, उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेतही मोठी कपात

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray Security : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशातच आता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्यामधील शिंदे-फडणवीस सरकारकडून कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. (Uddhav Thackeray’s big cut in security, Home Ministry’s decision)

गृहमंत्रालयाकडून उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक कपात करण्यात आली आहे. सुमारे 60 ते 70 पोलीस अधिकारी व कर्मचारी ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी कार्यरत होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पोलीस ठाण्यात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच मातोश्रीवरील सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांची संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट कार कमी करण्यात आली असून पायलट वाहनही कमी करण्यात आले आहे. मातोश्रीवरील एसआरपीएफची सुरक्षाही काढून घेण्यात आली होती.

Photo : एकेकाळी सलमान खानच्या भावाच्या प्रेमात होती, ‘बिग बॉस OTT 2’ ची ही स्पर्धक 

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा होती. मात्र, आता त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या ताफ्यात एस्कॉर्ट व्हॅनही कमी केल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे कुटुंबासोबतच मातोश्रीच्या आसपासच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील कमी करण्यात आली आहे. मातोश्रीच्या पुढील आणि मागच्या दोन्ही गेटवर पोलिस तैनात असतात. मात्र, आता ती सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. सुरक्षेतील कपातीमागील कारण अद्याप गृह विभागाने स्पष्ट केलं नाही. मात्र, सुरक्षा कमी केल्यानंतर आता हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरक्षा कपातीवरून खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मातोश्री जगभरातील दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. मातोश्रीवर गेल्या काही वर्षांपासून सुरक्षा होती, त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आली. मात्र राज्यात गद्दारांचे सरकार आल्यानंतर मातोश्रीच्या मुख्य गेटपासून ते आतपर्यंत खूप मोठ्या संख्येने कपात केली आहे. द्वेष आणि गलिच्छ राजकारणामुळे ही सुरक्षा कमी करण्यात आली. तर दुसरीकडे ठाण्यातील नगरसेवक आणि त्यांच्या पत्नीच्या पीएलाही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. गद्दारांना सुरक्षा दिली जाते, पण मातोश्रीची सुरक्षा कपात केली जाते, हा निंदनीय प्रकार आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

Tags

follow us