Download App

तुम्हाला लोक भाड्याने का घ्यावे लागतात? इंजिनाची चाकं…; अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray On Amit Shah : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू झाली. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भाजपचे (BJP) उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मविआवर जोरदार टीका केली. त्यांनी शिवसेनाचा उल्लेख नकली शिवसेना केला होता. त्याला आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोरदार प्रत्युत्तर दिलं.

बस रोखली, प्रवाशांना ताब्यात घेतले अन् हत्या केली; दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरला 

जळगावातील शेकडो बीआरएस कार्यकर्त्यांनी आज (दि. 13) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधले. याशिवाय लक्ष्मण पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Lok Sabha Election 2024 : मतदानासाठी ‘ही’ 12 प्रकारची ओळखपत्र ग्राह्य धरली जाणार 

ते म्हणाले, शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला एवढी लोक भाड्याने का घ्यावे लागत आहेत? इंजिनाची चाकं निखळली का आणि स्टेपनीवर का चालावं लागतयं? तुमच्याकडे इतके लोक होते, ते कुठे गेले? ते तुम्हाला कंटाळले का? त्याचा विचार नेतृत्वाने पक्षाच्या हितासाठी करावा, अशी विनंती करतो. कोणे एकेकाळी मित्र होतो. जुन्या नात्यातून सांगतो की, स्वत:चा चेहरा आरशात पाहा. तुम्हाला मेकअपची गरज का लागते? याचा विचार करा, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

ते म्हणाले, भाजप, वंचित, बीआरएसचे काही प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सरकारच्या कारभाराला कंटाळून आमच्या पक्षात आले आहेत. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवर त्यांची आशा राहिली आहे, असं ठाकरे म्हणाले.

देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार
ठाकरे म्हणाले की, एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे. हुकूमशाहाला स्वीकारणं घातक आहे. सरकारने संमिश्र पाहिजे. कारण, एका व्यक्तीच्या हातात संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी मोदींवर केली.

follow us