Ambadas Danve : शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा आज मुंबईत पार पडत आहे. ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर मेळावे पार पडत आहे. या मेळाव्यातून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीकेची तोफ डागण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपल्या भाषणादरम्यान, शेरोशायरी करीत शिंदे गटाला ललकारल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘महाराष्ट्राच्या जनतेसाठी आम्हीच वादळ आम्हीच तुफान, आम्हीच आग आम्हीच भींत, छाटू तुमचे पंख जोवर होत नाही तुमचा अंत, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे यांनी शिंदे गटाला ललकारलं आहे. या मेळाव्यात अंबादास दानवेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
मोहन भागवत अन् मोदी दोघेही देशाच्या आर्म अॅक्टचे गुन्हेगार; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
अंबादास दानवे म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेसाठी आम्हीच वादळ आम्हीच तुफान , आम्हीच आग आम्हीच भींत, छाटू तुमचे पंख, जोवर होत नाही तुमचा अंत…” अशी शेरोशायरी करीत अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला ललकारलं आहे. तसेच राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, बालकांच्या मृत्यूच्या घटना, बेपत्ता मुलींचं प्रकरण, कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे.
International Film Festival: नगरच्या मातीतील ‘उत्सवमूर्ती’ इफ्फीमध्ये दाखविणार
अंबादास दानवे यांच्या भाषणातील महत्वाची मुद्दे :
मेट्रो ट्रेनसाठी 6 हजार कोटी रुपये दिले जातात पण शेतकऱ्यांना देत नाहीत.
26 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान विमा योजनेचा लाभ मिळाला नाही.
सरकार म्हणतयं आपल्या दारी पण मी म्हणतो मृत्यू पाठवतयं घरोघरी.
नांदेड, नागपूर संभाजीनगर घटनेबद्दल सरकारला काही देण घेण नाही.
हापकिनला 108 कोटी मंजूर पण 1 रुपयाचंही औषध खरेदी केलं नाही.
एका खासदार येऊन नाटक करतो डॉक्टरांचा सन्मान सरकार राखत नाही.
राज्यातील शासकीय रुग्णालयात 6 हजार 700 बालकांचा मृत्यू घडला आहे.
नोकर भरतीच्या माध्यमातून सरकारकडून कोट्यावधी रुपये कमावले जात आहेत.
बांग्लादेशात मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक; डझनहून अधिक मृत्यू, 100 जखमी
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत असून राज्यातील विविध विषयांवरुन विरोधकांकडून सत्ताधारी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातून शिंदे गटाचे नेते अवधुत गुप्ते, ज्योती वाघमारे, यांच्यासह इतर नेते सडकून टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे.