Download App

हरामखोर आहेत ते! दिशा सालियन प्रकरणावरून भडकले पण ते वक्तव्य कुणाला उद्देशून?

Udhhav Thackeray दिशा सालियन प्रकरणावर म्हणाले की, ते हराम खोर आहेत. मात्र त्यांनी हे नेमकं कुणाला उद्देशून म्हटलं हे स्पष्ट झालं नाही.

Udhhav Thackeray Agressive on BJP for Disha Salian Case : तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे तसेच राम कदम यांनी देखील आरोप केले आहे. तर आता या प्रकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले की, ते हराम खोर आहेत. मात्र त्यांनी हे वक्तव्य नेमकं कुणाला उद्देशून केलं हे स्पष्ट झालेलं नाही.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विधिमंडळ परिसरात आले होते. त्यावेळी ते वरून सरदेसाई यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी हरामखोर आहेत ते असा शब्द वापरला. मात्र उद्धव ठाकरे नेमकं कुणाला हरामखोर म्हणाले हे स्पष्ट नाही. दरम्यान यावेळी ठाकरे यांनी वरून श्रद्धांजली यांना विचारलं की, हे प्रकरण कोणी उपक्रम काढलं. त्यावर सरदेसाईंनी ठाकरेंच्या कानात जे काही सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी संतापून हे वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं.

किवींचा पराक्रम! फक्त 60 चेंडूतच जिंकला सामना, मालिकाही खिशात; पाकिस्तानचा पराभव..

दरम्यान उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य भाजपने ते राम कदम यांना उद्देशून असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण देशासाठी आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राम कदम यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. कदम म्हणाले होते की, सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्यानंतर त्याच्या घरामध्ये रंगरंगोटी करण्याचं काम करण्यात आलं. तसेच बिहारच्या पोलिसांना सहकार्य केले गेले नाही आणि त्यावेळी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. मात्र जर त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर त्यांना याचा एवढा त्रास का होतो? कारण कर नाही त्याला डर कशाला हवी. असा सवाल कदम यांनी केल्यानेच ठाकरे त्यांच्यावर संतापले आणि त्यांनी हे वक्तव्य केलं असावं असं बोललं जात आहे.

follow us