Love Jihad च्या मुद्द्यावरून गदारोळ, विधिमंडळात शेलार, आव्हाड भिडले

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका […]

Aawahad Shelar

Aawahad Shelar

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. या दरम्यान आज विधिमंडळामध्ये लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी राज्यातील लव्ह जिहादच्या प्रकरणांची आकडेवारी मांडली त्यावरून हा गोंधळ झाला.

यावेळी भाजप आमदार अशिष शेलार (Aashish Shelar) यांनी लव्ह जिहादवर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. पण अशिष शेलार यांनी आपला मुद्दा मांडला. यावर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी सभागृहात लव्ह जिहाद प्रकरणाची चुकीचा माहिती दिल्याचा आरोप केला. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड देखील या मुद्द्यावर दिलेली माहिती चुकीची असल्याचा आरोप केला आहे.

‘हिंमत असेल तर भाजपने नागालँड सरकारचा पाठिंबा काढावाच’; अंधारेंनी दिले हिंदुत्व सिद्ध करण्याचे चॅलेंज

त्यानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीठासीन अधिकारी असलेल्या भास्कर जाधवांना विनंती केली की, आज अधिवेशनाचा आठवड्यातील शेवटचा दिवस आहे. आपण वाद-विवादापेक्षा आपण कामकाजावर लक्ष देऊ.असं देखील पावर म्हणाले.

Exit mobile version