Vanchit Bahujan युवा आघाडी शहराध्यक्षपदी परेश शिरसंगे… नवी कार्यकारिणी जाहीर!

पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीची (VBA) नवी पुणे शहर-जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी शिवाजीनगर मतदार संघातील परेश शिरसंगे (Paresh Shirsange) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीच्या उद्देशाने या कार्यकारिणीवर जबाबदारी देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. त्यांच्या आदेशानेच ही नवी […]

Paresh Shirsange

Paresh Shirsange

पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीची (VBA) नवी पुणे शहर-जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी शिवाजीनगर मतदार संघातील परेश शिरसंगे (Paresh Shirsange) यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीच्या उद्देशाने या कार्यकारिणीवर जबाबदारी देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. त्यांच्या आदेशानेच ही नवी कार्यकारिणी निवडण्यात आल्याचे परेश शिरसंगे यांनी सांगितले. तसेच वंचित बहुजन आघाडीची युवा शहर कार्यकारिणीत एक अध्यक्ष, सहा उपाध्यक्ष, एक महासचिव, चार सचिव, दोन संघटक तर तीन सहसचिव तसेच दोन सल्लागार अशी कार्यकारिणी असणार आहे.

वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारिणी
अध्यक्ष-परेश शिरसंगे, उपाध्यक्ष-सोमनाथ पानगावे, शतुल नाडे, कपिल शिवशरण, प्रमोद वनशिव, रोहन चौधरी, जुल्फीकर शेख, महासचिव-शुभम चव्हाण, सचिव-श्रीकांत जगताप, कौस्तुभ ओव्हाळ, अक्षय तायडे, संघटक-गोपाल वाघमारे, मनोज क्षीरसागर, सहसचिव-राहुल गायकवाड, सुयोग जाधव तर सल्लागारपदी वकील गजानन चौधरी आणि शिरीष पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version