‘तुझं माझं जमेना, आकड्यांचा तिढा सुटेना’; ‘वंचित’चं ‘मविआ’ला खरमरीत पत्र

Vanchit Bahujan Aghadi : मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठी (Loksabha Election) जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु असल्याचं दिसून येत आहे. नूकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीकडून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त करण्यात […]

'Prakash Ambedkar : मविआत जाण्याबाबत आंबेडकर अजूनही प्रचंड आशावादी; तिन्ही पक्षांना कधीपर्यंत डेडलाइन ?

'मविआ' अल्टिमेटमच्या बातम्यांत तथ्य नाही; वंचित आघाडीकडून स्पष्ट खुलासा

Vanchit Bahujan Aghadi : मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठी (Loksabha Election) जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु असल्याचं दिसून येत आहे. नूकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीकडून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना खरमरीत पत्रच लिहिलं आहे.

महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागावाटपाचा तिढा कायम आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी महाविकास आघाडीला एक पत्र लिहिलंयं. या पत्रातून त्यांना नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन आमचा अवमान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वंचितला फक्त दोन जागा दिल्याचा दावा रेखा ठाकूर यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीची बैठक झाली.
या बैठकीतून आंबेडकर लगेच निघून गेले होते त्यावेळी ते म्हणाले होते की माझ्या चेहऱ्यावरुन तुम्हाला वाटत नाही का? ते आता स्पष्ट झालं आहे.

राणेंच्या नगर दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध, काळे झेंडे दाखवण्यापूर्वीच पोलिसांनी घेतलं ताब्यात

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्मूला अद्याप ठरलेला नसून जागावाटपाच्या नाराजीबाबत ठाकूर यांनी थेट उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरातांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केली . दोन जागांचा प्रस्ताव आम्हाला दिला आहे. तो आम्हाला मान्य नाही, असं स्पष्ट शब्दांत ठाकूर यांनी लिहिलं आहे.

दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फुट पडली आहे. नेते सोडून भाजपासोबत गेले आहेत. आमचा मोठा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक जागा हव्यात असं पत्रात म्हटलं आहे. अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अवघ्या दोनच जागा दिल्या असल्याचं ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पुढील काळात महाविकास आघाडी आणि वंचितची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version