Vidhansabha Election Opinion Poll : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (दि. 16 ऑगस्ट) हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) दिवाळीनंतर होतील असे संकेत आयोगाने दिले. दरम्यान, विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली. दरम्यान, राज्यात आज निवडणुका झाल्या तर कोण सत्तेत येणार? याचा अंदा टाइम्स-MATRIZE (Times-MATRIZE) च्या सर्व्हे वर्तवण्यात आला.
‘मी शरद पवारांना नेता मानतो पण नाईलाजाने…’, राजेंद्र शिंगणे देणार अजित पवारांना धक्का?
टाइम्स-MATRIZE च्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजपला 95 ते 105 जागा मिळू शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलाच फटका बसणार आहे. शिवसेनेच्या 19 ते 24 जागा येण्याची शक्यता आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 26 ते 31 जागा मिळू शकतात. काँग्रेस पक्षाला 42 ते 47 जागा मिळतील असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ओपिनियन पोलनुसार पक्षाला 23 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय इतर पक्षांचा आणि अपक्षांचा 11 ते 16 जागांवर विजय होईल, असा दावा ओपिनियन पोलमध्ये करण्यात आला.
धमक्या देऊन महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला बोलावले; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
टाइम्स-MATRIZE च्या सर्वेनुसार भाजपला 25.8 टक्के, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 14.2 टक्के मते मिळू शकतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 5.2 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला 18.6 टक्के तर उद्धव ठाकरे यांना 17.6 टक्के मते मिळू शकतात. याशिवाय विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 6.2 टक्के मते मिळू शकतात. तर इतर पक्षांना 12.4 मते मिळतील असा टाइम्स-MATRIZE चा अंदाज आहे.
ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. 27 टक्के लोकांनी शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर 23 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. याशिवाय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 21 टक्के लोकांनी पंसती दिली.
दरम्यान, ओपिनियन पोलनुसार, आज निवडणूका झाल्यास भाजपला 95 ते 105 जागा मिळतील. भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्या तरी बहुमतासाठी त्यांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.